Makhana  sakal
फूड

Makhana Bhel Recipe: घरच्या घरीच बनवा चटकदार मखाना भेळ, जाणून घ्या सोपी रेसिपी

दिवसभरात थोडी भूक लागली तरी स्नॅक म्हणून मखाना भेळ खाऊ शकतो.

Aishwarya Musale

मखानापासून बनवलेली भेळ स्वादिष्ट तर असतेच शिवाय पौष्टिकतेनेही परिपूर्ण असते. जर तुम्हाला दिवसाची सुरुवात चवदार आणि आरोग्यदायी करायची असेल तर तुम्ही मखाना भेळची रेसिपी करून पाहू शकता.

दिवसभरात थोडी भूक लागली तरी स्नॅक म्हणून मखाना भेळ खाऊ शकतो. तुम्ही अनेकदा मुरमुरेची भेळ चाखली असेलच, पण जर तुम्हाला भेळची नवीन व्हरायटी ट्राय करायची असेल, तर मखाना भेळ हा एक उत्तम पर्याय असू शकतो. बनवायला खूप सोपी आहे आणि मखाना भेळ काही मिनिटात तयार होते.

मखानापासून बनवलेली भेळ तयार करण्यासाठी शेंगदाणे, टोमॅटो, बीटरूट, गाजर यासह इतर गोष्टी मिसळता येतात. त्यात अनेक प्रकारचे मसालेही वापरले जातात. गोड चिंचेची चटणी आणि हिरवी पुदिना-कोथिंबीर चटणी मखाना भेळची चव आणखी वाढवते. चला जाणून घेऊया मखाना भेळ बनवण्याची सोपी रेसिपी.

मखाना भेळ बनवण्यासाठी साहित्य

  • मखना - २ कप

  • शेंगदाणे - १/२ कप

  • बारीक चिरलेला कांदा – १/२ कप

  • बारीक चिरलेले टोमॅटो - १/२ कप

  • गाजर बारीक चिरून - १/२ कप

  • बारीक चिरलेली बीटरूट - १/२ कप

  • हिरवी मिरची चिरलेली – २

  • कोथिंबीर चिरलेली – १/४ कप

  • लाल मिर्च पावडर - 1/4 टीस्पून

  • चाट मसाला - १/२ टीस्पून

  • देसी तूप - ३-४ टीस्पून

  • हिरवी चटणी - आवश्यकतेनुसार

  • चिंचेची चटणी - आवश्यकतेनुसार

  • शेव - 1/4 कप

  • मीठ - चवीनुसार

मखाना भेळ कशी बनवायची

प्रथम एका कढईत थोडे तूप टाकून मध्यम आचेवर गरम करा. तूप वितळल्यानंतर त्यात शेंगदाणे टाकून तळून घ्या. शेंगदाणे चांगले तळून झाल्यावर एका भांड्यात काढा. आता कढईत मखाना घालून तेही तळून घ्या. 5-6 मिनिटे मखाना चांगले तळून झाल्यावर त्यात तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून तळून घ्या.

मखाना व्यवस्थित तळून झाल्यावर गॅस बंद करून एका भांड्यात काढा. आता कांदा आणि टोमॅटो घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा. यानंतर बीटरूट आणि गाजर बारीक चिरून घ्या. आता एक मोठा मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यात भाजलेले शेंगदाणे आणि मखाना घालून व्यवस्थित मिक्स करा. यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बीटरूट आणि गाजर घालून मिक्स करा.

यानंतर मखाना भेळच्या मिश्रणात चाट मसाला, हिरवी चटणी आणि गोड चिंचेची चटणी घालून मिक्स करा. नंतर चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची घाला. चविष्ट मखाना भेळ तयार आहे. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून हिरव्या कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 20th Installment: शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता; लाभार्थी यादी कशी तपासाल?

Mumbai-Pune Expressway : चालकांची नियम मोडण्यात ‘द्रुतगती’, तब्बल २७ लाख वाहनांवर कारवाई; ४७० कोटींचा दंड, ५१ कोटी वसूल

Snake Video : गळ्यात साप, दातात साप! लाखों ‘जिवंत’ नाग घेऊन निघाली अनोखी नागपंचमी यात्रा; व्हिडीओ तुफान व्हायरल

काय सांगता? 'तारक मेहता...' मधील माधवी भाभी चेन स्मोकर आहे? म्हणते- मला काहीही फरक पडत नाही...

R. Madhavan Son's Daily Routine: "लवकर झोपा, लवकर उठा!" आर. माधवनचा मुलगा रोज उठतो पहाटे ४ वाजता! आयुर्वेदानुसार ब्रह्म मुहूर्तात उठणं आरोग्यासाठी का ठरते गेमचेंजर?

SCROLL FOR NEXT