
अविनाश ढगे
पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम (आईटीएमएस) यंत्रणा बसविली. त्यास येत्या शुक्रवारी एक वर्ष होत आहे. या कालावधीत बेदरकार चालकांनी वाहतूक नियमांचे केल्याबद्दल २७ लाख ७६ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली. त्यातून ४७० कोटींचा दंड ठोठावण्यात आला. यापैकी ५१ कोटी ३२ लाखांचा दंड वसूल झाला.