Ganesh Visarjan 2022
Ganesh Visarjan 2022 esakal
ganesh article

Ganesh Visarjan 2022 : मूर्ती हलवल्यावर पुन्हा विसर्जन घाटावर आरती करावी? जाणून घ्या नियम

सकाळ डिजिटल टीम

Ganesh Visarjan 2022 : उद्या गौरीसोबत जाणाऱ्या गणरायाचे विसर्जन होणार आहे. या ५-६ दिवसात गुंजणारा गणपती बाप्पा मोरया... च्या जयघोषासोबत आता पूढच्यावर्षी लवकर या... चा जय घोष ऐकायला येणार आहे. बऱ्याच लोकांसाठी हा हळवा क्षण असतो. घरोघरी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना झालेली आहे.

गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो. त्याच पद्धतीने गणपती विसर्जन करण्यापूर्वी गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते. या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असे मानले जाते. याचीपण एक पध्दती आहे.

विसर्जन विधीमध्ये गणपतीची आरती करून उत्तर पूजा केली जाते. गणपतीवर अक्षता, फूले वाहिले जातात. त्यानंतर मूर्ती हलविली जाते. जसे मूर्तीत प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्यात गणरायाचे वास्तव्य मानले जाते. ते उत्तर पूजेनंतर मूर्ती हलवेपर्यंतच असते असे मानले जाते. एवढ्या दिवस श्रध्देने मनोभावे पूजलेल्या या मूर्तीला नंतर पाण्यात विसर्जित केले जाते. गणपतीवर अक्षता टाकल्यानंतर आणि गणपतीची मूर्ती हलव्यानंतर गणपतीचे विसर्जन झालेले आहे. त्यामुळे जिथे विसर्जनासाठी जाणार असाल तिथे पुन्हा आरती, नैवेद्य काहीही करण्याची आवश्यकता नसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT