
Rahul Gandhi and Mallikarjun Kharge skipped the Independence Day ceremony at Red Fort:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर सलग बाराव्यांदा भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकावला. यासह, सलग सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावणारे ते दुसरे पंतप्रधान बनले आहेत. मात्र त्यांनी इंदिरा गांधी यांचा विक्रम याबाबतीत मोडला आहे. शुक्रवारी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आतापर्यंतच्या त्यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणापैकी सर्वात मोठं १०३ मिनिटं भाषण मोदींनी यावेळी केलं.
मात्र या ऐतिहासिक सोहळ्याला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची गैरहजेरी होती. आता या मुद्य्यावरून राजकारणही तापले. भाजपने या मुद्द्यावर काँग्रेसला घेरले. आता काँग्रेसनेही संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसने राहुल गांधी आणि खरगे स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला का गेले नाहीत हे सांगितले आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते अजय उपाध्याय यांनी 'आज तक' या वृत्तवाहिनीवर आयोजित कार्यक्रमात या मुद्द्यावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आले होते. पण पूर्वी विरोधी पक्षनेते नेहमीच पहिल्या रांगेत बसत असत. गेल्या ७८ वर्षांत पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला मागच्या रांगेत बसवण्यात आले होते. खरंतर लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्याला पंतप्रधान मोदींसोबत पुढच्या रांगेत बसवण्याची संसदीय परंपरा कायम आहे. मात्र, गेल्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात ही परंपरा मोडली गेली .
याशिवाय उपाध्याय पुढे म्हणाले की, हा केवळ राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेते म्हणून असलेला प्रश्न नाही. हा एका संवैधानिक पदाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. हा संविधानाच्या प्रतिष्ठेचा भंग आहे. यावेळी प्रतिष्ठेचा भंग होऊ नये म्हणून राहुल गांधी आणि खर्गे यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि राष्ट्रध्वजही फडकावला आहे. अशा परिस्थितीत या मुद्द्यावर राजकारण होऊ नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.