
लिओनेल मेस्सीला भारत भेटीसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू मेस्सीच्या भारत दौऱ्याला अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्याचा तीन दिवसांचा दौरा १२ डिसेंबरपासून कोलकाता येथून सुरू होईल. या कार्यक्रमाचे प्रवर्तक सताद्रु दत्ता यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. मेस्सीच्या 'GOAT टूर ऑफ इंडिया २०२५' या दौऱ्याचा पहिला मुक्काम कोलकाता असेल. त्यानंतर ते अहमदाबाद, मुंबई आणि दिल्ली येथे येणार आहे. १५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन हा दौरा संपेल.