Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Love Jihad Case in Hyderabad: याप्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत ; जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे?
Police uncover Hyderabad love jihad case where a Pakistani national allegedly deceived a Hindu girl, sparking political and social debate.
Police uncover Hyderabad love jihad case where a Pakistani national allegedly deceived a Hindu girl, sparking political and social debate.esakal
Updated on

Hyderabad love jihad case involving Pakistani national: हैदराबादमधील बंजारा हिल्स भागात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी मूळ पाकिस्तानी असणाऱ्या फहाद नावाच्या भामट्याविरुद्ध 'लव्ह जिहाद'चा गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे. फहादवर त्याचे राष्ट्रीयत्व लपवण्याचा, बेकायदेशीर कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवण्याचा आणि हिंदू मुलीस प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मांतर करण्याचा आरोप आहे.

 फहाद याने हिंदू मुलीचे नाव बदलून 'दोहा फातिमा' केले आणि २०१६ मध्ये तिच्याशी लग्न केले. मात्र आता फहाद तिला सोडून दुसऱ्या महिलेसोबत स्थायिक झालाय. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या पीडित हिंदू युवतीने धाडस करून पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फहाद १९९८ मध्ये पाकिस्तानहून भारतात आला आणि हैदराबादमध्ये स्थायिक झाला होता. त्याला हाय-टेक सिटीमधील एका कंपनीत नोकरी मिळाली, परंतु त्याने यासाठी आपली मूळ पाकिस्तानी असल्याची ओळख लपवली होती. पुढे फहादने बंजारा हिल्समधील माउंट बंजारा कॉलनीत राहणाऱ्या एका हिंदू मुलीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तिचे धर्मांतर केले. पुढे २०१६ मध्ये फहादने तिच्याशी लग्न केले आणि तिचे नाव 'दोहा फातिमा' असं ठेवले.

Police uncover Hyderabad love jihad case where a Pakistani national allegedly deceived a Hindu girl, sparking political and social debate.
Police officer kicking protester VIDEO: …अन् पोलिस अधिकाऱ्याने फिल्मी स्टाईलने 'त्या' आंदोलकाच्या कंबरेत घातली लाथ ; व्हिडिओ व्हायरल !

यानंतर काही वर्षे सोबत राहिल्यानंतर, फहादने त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आणखी एका महिलेला त्याच्या जाळ्यात अडकवले. त्याने या महिलेचेही धर्मांतर केले आणि तिच्यासोबत राहू लागला. परंतु जेव्हा आधीच्या हिंदू तरूणीला हे कळले तेव्हा तिने फहाद आणि त्याच्यासोबतच्या नवीन महिलेस रंगेहाथ पकडले व पोलिसांना याबाबत माहिती दिली. आता पोलिसांनी फहाद आणि दुसऱ्या महिलेला अटक केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फहादने दुसऱ्या महिलेशी लग्न केले की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Police uncover Hyderabad love jihad case where a Pakistani national allegedly deceived a Hindu girl, sparking political and social debate.
Bhorya Independence Day Speech Video : स्वातंत्र्यदिनानिमित्त भोऱ्यानं केलं पुन्हा एक तुफान भाषण; सोशल माडियावर प्रचंड व्हायरल!

याप्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. फहादचे वडील पाकिस्तानी होते आणि त्याची आई हैदराबादी होती. दोघांनीही दुबईत काम करताना लग्न केले आणि नंतर पाकिस्तानला गेले. फहादच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची आई हैदराबादला परतली. फहादचा भाऊ आणि आई अजूनही पाकिस्तानी नागरिकत्व धारण करतात, परंतु फहादला २०१८ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले. आश्चर्याची बाब म्हणजे फहादकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र अशी कागदपत्रे होती. इतकेच नाही तर फहादने बँकेकडून कर्जही घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com