गणेशोत्सवात मिठाई विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर गोडवा
गणेशोत्सवात मिठाई विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर गोडवा  
ganesh article

गणेशोत्सवात मिठाई विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर गोडवा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य देण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे मोदक मिठाईच्या स्वरूपात असतात. घरगुती गणपती, मंडळांच्या गणपतीच्या नैवेद्यासाठी मिठाईच्या दुकानांमध्ये चांगलीच गर्दी होत आहे. गतवर्षी गणेशोत्सवात निर्बंध होते. त्यामुळे मिठाई विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा निर्बंध उठल्याने अन् ग्राहकांचा प्रतिसादही चांगला असल्याने गणेशोत्सवात मिठाई विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर गोडवा दिसत आहे.

खाद्यतेल, तूप, दुधाच्या भावात वाढ झाल्याने मिठाईच्या वस्तूंमध्ये भाववाढ झाली आहे. मिठाई विक्रेत्यांचे ऐन सणासुदीच्या काळात कोरोनामुळे दुकान बंद असल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यंदा मिठाईच्या किमतीत किलोमागे जवळपास ८० ते १०० रुपये वाढ झाली आहे. कोरोनाकाळातील नुकसान भरून निघणार नसले तरी गणेशोत्सवात ग्राहकांनी मिठाईच्या वस्तू घेणे पसंत केल्यामुळे मिठाई विक्रेत्यांना काहीसा दिलासा मिळाल्याची स्थिती आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ग्राहकांचा मोठा प्रतिसाद असल्यामुळे असाच प्रतिसाद आनंद चतुर्थीपर्यंत कायम असेल, अशी आशा मिठाई विक्रेत्यांना आहे. खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे इतर वस्तूही महागल्या असल्याचे दिसत आहे. गणेशोत्सवात ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्यामुळे लाखोंची उलाढाल होत असून, नेवैद्य दाखविण्यासाठी मोतीचूरचे लाडू, मोदक पेढ्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे चित्र आहे.

कोरोनामुळे गतवर्षी निर्बंध असल्यामुळे व्यवसायात मंदी होती. यंदा तशी परिस्थिती नसून, गणेश चतुर्थीपासूनच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. खाद्यतेल, तूप, दुधाच्या भावात वाढ झाल्याने मिठाईच्या वस्तूंमध्ये वाढ झाली आहे.

- श्‍याम पुरोहित, मिठाई विक्रेता

असे आहे दर

वस्तू वर्ष २०२१ वर्ष २०२०

मोदक ४८० ४००

मोदक पेढे ४०० ३६०

मलई पेढे ४८० ३८०

मोतीचूर लाडू २२० १६०

-तुषार महाले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT