vidarbhache ashtavinayak
vidarbhache ashtavinayak e sakal
ganesh article

विदर्भाचे अष्टविनायक : चिंतामणी अन् वरदविनायक गोराळा गणपतीचं महत्व

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : महाराष्ट्रातील अष्टविनायक सर्वांना माहिती आहे. तसेच गणेशोत्सव म्हटलं की, मुंबई आणि कोकणात धुमधडाक्यात गणेशोत्सव (ganesh festival 2021) साजरा केला जातो. पण, राज्याच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणून विदर्भाची (ganesha in vidarbha) ओळख आहे. याच विदर्भात सर्वगुणसंपन्न् अशा प्रदेशात गणपतीची अनेक मंदिरे आणि मूर्ती पाहायला मिळतात. अशाच विदर्भातील अष्टविनायकाचे (vidarbha ashtavinayak) दर्शन आपण या गणेशोत्सवानिमित्त घेणार आहोत. याआधीच्या भागात आपण नागपूरचा टेकडी गणपती, रामेटकचा अष्टदशभूजा गणपती, भंडाऱ्याचा भृशुंड गणपती, केळझर, आदासा आणि पवनी येथील गणपतींची माहिती बघितली. आज आणखी दोन गणपतींबद्दल जाणून घेऊया.

कळंबचा गणपती -

विदर्भाच्या अष्टविनायकापैकी एक म्हणजे सर्व चिंताचे हरण करणारा चिंतामणी गणपती. हा गणपती नागपूर-यवतमाळ मार्गावरील कळंब इथं वसला आहे. प्रसिद्ध २१ गणपती क्षेत्रांपैकी कळंब हे एक आहे. त्याला आधी कदंबपूर म्हणून ओळखले जायचे. अंदाजे १५ फूट जमिनीखाली ही मूर्ती स्थापन केलेली आहे. त्यासाठी तीन जिने उतरून आपल्याला तिथे जावे लागते. मूर्तीवर खूप मोठय़ा प्रमाणात शेंदूर चíचलेला असल्यामुळे मूर्तीची वैशिष्टय़े समजत नाहीत. जवळच एक चौकोनी पावनकुंड असून त्याच्या पाण्यात औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. कोणतेही त्वचारोग त्या पाण्याने दूर होतात, असे इथे सांगितले जाते. इथे जमिनीखाली पाण्याचे प्रवाह आहेत. त्या पाण्याची पातळी वाढून या गाभाऱ्यात पाणी साठू लागते आणि गणेशमूर्तीच्या पायाला पाणी लागले की पुन्हा ते ओसरते. असा प्रसंग बारा वर्षांतून एकदा घडतो.

वरदविनायक गौराळा-भद्रावती

विदर्भातील अष्टविनायकापैकी एक म्हणजे भद्रावती येथील वरदविनायक. मंदिर बांधण्यापूर्वी ही टेकडी गायी चराईसाठी राखीव होती. त्यामुळे या ठिकाणाला गोराळा असं नाव पडलंय. या संपूर्ण परिसराला प्राचीनतेचा स्पर्श लाभलेला आहे. वाकाटक या बलाढय़ राजवटीखाली असलेला हा प्रदेश मोठा समृद्ध होता. टेकडीवर चढत असताना वाटेत काही भग्न मूर्ती पाहायला मिळतात. याच टेकडीच्या मागच्या अंगाला एक गुहा खोदलेली असून त्यात काही सुंदर शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात. त्यात गणपती, शेषशायी विष्णू, त्रिविक्रम या मूर्ती आहेतच, परंतु तिथेच दोन मीटर उंचीची केवल नरसिंहाची सुंदर मूर्ती कोरलेली दिसते. ही मूर्ती पाहून रामटेक इथल्या नरसिंहाच्या मूर्तीची आठवण होते.

गणपती मंदिराला १६ खांब असलेला भव्य सभामंडप आहे. गणपती मंदिर आणि मूर्ती दोन्ही उत्तराभिमुख आहेत. मुख्य गाभारा काहीसा खालच्या पातळीत असल्यामुळे काही पायऱ्या उतरून प्रवेश करावा लागतो. आत अंदाजे आठ फूट उंचीची गणेशाची बसलेल्या स्थितीतली मूर्ती आहे. उजवा पाय मुडपून जमिनीवर आहे, तर डावा पाय दुमडून शेजारी उभ्या स्थितीत दिसतो. देवाला दोनच हात असून दोनही हातात मोदकपात्र दिसते. गणपतीच्या पोटात काही धन असेल असे वाटल्यामुळे काही चोरांनी त्याची नासधूस केली होती. आता ते पूर्ववत केलेले आहे. गणपतीच्या मस्तकाभोवती प्रभामंडळ कोरले असून त्यावर मुकुट कोरलेला दिसतो. प्रसन्न अशी गणपतीची मूर्ती आणि हा सगळाच परिसर आवर्जून पाहावा असा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT