Ganesh Chaturthi Special Recipe esakal
ganesh darshan

Ganesh Chaturthi Special Recipe : मधुमेह आहे? चिंता करू नका, बाप्पासाठी बनवा हे 2 शुगर फ्री पदार्थ

ज्यांना मधुमेह आहे त्यांचे काय? मग अशांनी बाप्पासाठी हे २ शुगरफ्री पदार्थ बनवा.

साक्षी राऊत

Ganesh Chaturthi Special Recipe : बाप्पाच्या आगमनाला अवघे काहीच तास उरले असून त्यांच्या आगमनाची तयारी सगळीकडे अगदी धुमधडाक्यात सुरु आहे. गणशोत्सवाला भक्त त्यांच्या लाडक्या बाप्पासाठी त्यांच्या आवडीचा नैवेद्य बनवतात. या संपूर्ण उत्सवात सगळ्यांच्या घरी गोडधोड जेवण आणि पदार्थ मोठ्या प्रमाणात बनवले जातात. मात्र ज्यांना मधुमेह आहे त्यांचे काय? मग अशांनी बाप्पासाठी हे २ शुगरफ्री पदार्थ बनवा.

शुगर फ्री मिठाई बनवण्याची रेसिपी

१) शुगर फ्री खीर

शुगर फ्री खीर ही हळू हळू दूध उकळून बनवल्या जाते. तेव्हा जाणून घ्या शुगर फ्री खीर बनवण्याची सोपी रेसिपी

रेसिपीसाठी लागणारे साहित्य

दूध

तांदूळ

छोटी विलायची

आर्टिफिशियल स्वीटनर

पिस्ता

गुलाब इसेंस

बदाम

रेसिपी बनवण्याची पद्धत

ही रेसिपी बनवण्यासाठी आधी तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्या. आता एका ब्लेंडरमध्ये तांदूळ बारीक करून घ्या. आता एका पॅनमध्ये दूध उकळवा. आता बारीक केलेले तांदूळ त्यात घाला. स्लो फ्लेमवर आता शिजवा. अध्ये मध्ये चमच्याने खीर ढवळत राहा. २०-२५ मिनिटे शिजू द्या. शेवटी त्यात विलायची आणि स्वीटनर घाला. आता खीरमध्ये पिस्ता आणि गुलाब इसेंस असलेले पाणी घाला. (Food)

बर्फीसाठी लागणारे साहित्य

मावा

बदाम

विलायची पावडर

जायफळ पावडर

बनवण्याची पद्धत

बदाम बर्फी बनवण्यासाठी कढईत मावा आणि बारीक केलेली बदाम घ्या. हे सगळं एकत्र मिक्स करून घ्या आणि ५ मिनिटांत मध्ये मध्ये चमच्याने परतून घ्या. (Recipe) आता यात मेवे, विलायची पावडर आणि जायफळ पावडर टाका. याला चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. आता एका प्लेटला तूप लावा आणि तयार केलेलं मिश्रण त्यात पसरवा आणि एकसमान पसरून घ्या. आता ते थंड होऊ द्या. याला ४-५ तास असेच ठेवा. आणि नंतर त्याचे समान काप करून घ्या. तुमची बदाम बर्फी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT