ganesh-festival

Ganesh Festival : गणपती विसर्जनाला ड्रोनचा कडक पहारा

सकाळवृत्तसेवा

अकोला : अतीसंवेदनशील असलेल्या शहरात पोलिसांचा गणपती विसर्जनाच्या दिवशी तगडा बंदोबस्त असतो. या बंदोबस्ताला जोड मिळणार आहे, ती ड्रोनच्या नजरेची. विसर्जन मिरवणूक मार्गावर ड्रोननुसार चित्रीकरण करण्यात येणार असले तरी संपूर्ण मार्गावर आधीच सीसी कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.

दहा दिवसांच्या गणपती उत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. गणपती उत्सवात कुठलीही अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलिस सतर्क'आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या दरम्यान राहणार आहे. यासोबतच शहरातील अतीसंवेदनशील भागामध्ये पोलिसांकडून रूटमार्चही करण्यात येत आहे. कुठल्याही परिस्थितीशी पोलिस सामना करण्यास तयार असल्याचा इशारा समाजकंटकांना या माध्यमातून देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, अकोला शहरात पोलिस बंदोबस्तामध्ये कुठलीही कमतरता राहणार नसल्याचे दिसून येत आहे. बंदोबस्तासाठी रॅपीड फोर्सची एक कंपनी, राज्य राखीव दलाची एक कंपनींसह एक पोलिस अधीक्षक, 14 पोलिस निरीक्षक, 17 सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकांसह 550 पोलिस कर्मचारी, 100 महिला पोलिस कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे. गृहरक्षक दलाचे 300 जवान या बंदोबस्तात कर्तव्य बजाविणार आहेत. सोबतच प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांनाही बंदोबस्तात समाविष्ट करण्यात आले अाहे.

तत्पूर्वी, गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर आधीच पोलिसांनी सीसी कॅमेऱ्यांची नजर ठेवली आहे. तसेच त्याला जोड म्हणून पोलिसांनी संपूर्ण रस्त्यावर ड्रोनचाही कडक पहारा राहणार आहे.

17 तडीपार
गणपती उत्सवांसह दुर्गा उत्सव, दसरा व दिवाळीपर्यंत गुंडप्रवृत्तीचे आणि शांतता भंग करणाऱ्यांना पोलिस विभागाकडून तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यापैकी, 17 जणांवर 6, 3 महिन्यांसह 1 वर्षांच्या कालावधीसाठी तडीपारीचे आदेश काढले आहेत.

गणेश उत्सवात कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा कडा पहारा राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास पोलिस प्रशासन सज्ज आहे. - उमेश माने, पोलिस शहर उपअधीक्षक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT