लष्कर आणि पोलिसांच्या ‘सुरक्षा कवच’चा संयुक्त सराव
लष्कर आणि पोलिसांच्या ‘सुरक्षा कवच’चा संयुक्त सराव Sakal
गणेशोत्सव फोटो स्टोरी

लष्कर आणि पोलिसांच्या ‘सुरक्षा कवच’चा संयुक्त सराव; पाहा फोटो

अक्षता पवार

अग्निबाज विभागातर्फे लुल्लानगर येथे लष्कर आणि महाराष्ट्र पोलिस दलाचे ‘सुरक्षा कवच’ या संयुक्त सरावाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.

पुण्यातील कोणत्याही संभाव्य दहशतवादी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या कवायती आणि कार्यपद्धती यांचा मेळ साधणे हा या सरावाचा उद्देश होता.
या सरावात भारतीय लष्कराच्या दहशतवाद विरोधी कृती दल (सीटीटीएफ), महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकासह तत्काळ कृती दले (क्युआरटी), श्वान पथके आणि विस्फोटक निकामी पथकांचा समावेश होता.
लोकवस्तीच्या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीत लष्कर आणि पोलिसांच्या विविध पथकांव्दारे या दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी कशी व कोणती कारवाई केली जाऊ शकते याचा सराव यावेळी करण्यात आला.
लुल्लानगर येथील एका बांधकाम सुरू असलेल्या जागेवर हा कृत्रिम सराव करण्यात आला. सरावात कृत्रिम बुद्धिमत्ता माहितीच्या आधारे, दोन्ही विभागांची उत्कृष्ट दले सक्रिय करण्यात आली.
सरावादरम्यान वाहतूक आणि लष्करी पोलिसांच्या पथकाद्वारे रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रण, अपघातग्रस्तांसह संकुलातील लोकांना बाहेर काढणे, अज्ञात वस्तू, स्फोटके शोधून ते नष्ट करणे अशा विविध कारवाई करण्यात आल्या.
सरावासाठी आवश्यक उपकरणांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी लष्कर आणि महाराष्ट्र पोलिस या दोघांनाही त्यांच्या कवायती आणि कार्यपद्धती सुव्यवस्थित करण्याची संधी उपलब्ध करून दिली, ज्यामुळे दोन्ही विभागांमधील समन्वय वाढला.
लष्कर आणि पोलिसांच्या ‘सुरक्षा कवच’चा संयुक्त सराव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT