ग्लोबल

ऍमेझॉनच्या वणव्यामुळे कोंडला जगाचा श्वास

सकाळ वृत्तसेवा

रिओ दि जानेरो : सध्या सर्व जगाचे लक्ष ब्राझीलकडे लागले असून याचे कारण ऍमेझॉन नदीच्या खो-यातील आग आहे. जगातील सर्वात मोठे जंगल म्हणून ओळख असणा-या ऍमेझॉनच्या जंगलात मागील काही वर्षात वणवा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असून ही गोष्ट केवळ ऍमेझॉन किंवा तेथील जवळच्या प्रदेशांसाठीच मर्यादित नसून संपूर्ण जगभरात याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. याचे कारण संपूर्ण जगाला सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा हा ऍमेझॉन नदीच्या खो-यातील वृक्षांमुळे होतो आणि सततच्या वणव्यांमुळे या सदाबहार वृक्षांची संख्या कमी होत आहे. 

ऍमेझॉन नदीचे खोरे हे जैवविविधतेने सजलेले आहे. विविध प्रकारचे वृक्ष आणि प्राण्यांनी गजबजलेल्या या जंगलात 2013 पासून वणवा लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान  मागील शुक्रवारी (ता.23) लागलेली आग इतकी भयानक होती की, त्यामुळे संपूर्ण जंगलातील अनेक वृक्ष आणि प्राण्यांना आपला जीव या वणव्यात गमवावा लागला. सध्या या आगीने आंतरराष्ट्रीय पातळीवर भडक घेतली असून संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे लागून राहीले आहे. जगातील सर्वाधिक कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजनचा पुरवठा हा ऍमेझॅानच्या जंगलातूनच होतो. त्यामुळे पृथ्वीचे फुफ्फुस मानले जाणा-या ऍमेझॅान खो-यातील आग ही जागतिक पातळीवरील संकट बनले आहे.

दरम्यान ऍमेझॅानच्या खो-यातील 60 टक्के भाग ब्राझीलमध्ये येत असल्याने ब्राझील सरकारने जवान आणि सुरक्षायंत्रणाना तेथे पाठविले आहे. याव्यतिरिक्त जगभरातील देशांनी या आगीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी ब्राझीलला आपला पाठिंबा दर्शविला असून सोशल मीडियावर देखील याबद्दल ब-याच पोस्ट पाहायला मिळत आहेत. सध्या #PrayForAmazonas हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड झाला आहे. 


ही आहेत आग लागण्याची कारणे... 
 
ऍमेझॉन नदीच्या खो-यातील आग संपूर्ण जगातील प्राण्यांसह मनुष्यासाठी चिंतेची बाब बनली असून याचे कारण ही मनुष्युच आहे. जमीनीच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. तसेच वृक्षांच्या चाटणीनंतर त्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी आग लावण्यात येते आणि हीच आग पुढे भडका घेऊन वणव्यात रूपांतरीत होते. त्यामुळे वृक्षतोड हे या आगीमागील मोठे कारण आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT