ग्लोबल

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे देणार राजीनामा

वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. याबाबतची घोषणा 'डाउनिंग स्ट्रीट' येथील पीएम हाऊस येथे त्यांनी आज (शुक्रवार) केली. ब्रेक्झिट करारात अपयशी झाल्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. तसेच 7 जूनला 'कंझर्वेटिव्ह पक्षा'चे अध्यक्षपदही सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

युरोपीय संघातून ब्रिटनला बाहेर करण्यासाठी आपल्या पक्षाची समजूत काढण्यात थेरेसा मे अपयशी झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तसेच संसदेतही त्यांची ब्रेक्झिट योजना अनेकवेळा नाकारण्यात आली होती. त्यानंतर आता अखेर थेरेसा मे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या या पदावर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून राहू शकतात, अशी माहिती मिळत आहे. 

पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात

थेरेसा यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले, की "माझ्यासाठी ही फार मोठी दु:खदायक घटना आहे. ब्रेक्झिट करार यशस्वी करण्यात मी कमी पडले. त्यामुळे मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असून, पुढील पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया येत्या आठवड्यात सुरू होईल." 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT