china, clinical trial, Corona vaccine news, Peru
china, clinical trial, Corona vaccine news, Peru 
ग्लोबल

चीनच्या लशीचे गंभीर परिणाम; पेरु सरकारने दिली ट्रायलला स्थगिती

सकाळ ऑनलाईन

China Covid 19 vaccine trail in peru stopped :  पेरूमध्ये सुरु असलेल्या चिनी कोरोना लशीच्या ट्रायलला स्थगिती दिल्याचे वृत्त आहे.  ट्रायलवेळी एक गंभीर घटना घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच लशीची ट्रायल थांबवण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला. पेरु सरकारने चीनच्या  (China’s Sinopharm Covid-19 vaccine Trial) थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या लशीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या एका स्वंयसेवकावक (volunteer) लशीचे दृष्परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. 

पेरू सरकारच्या (Peru Government) आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्वंय सेवकावर झालेला प्रतिकूल परिणाम लशीमुळे झाला आहे की त्याला अन्य काही कारणे आहेत याचा तपास सुरु आहे.  सिनोफ़ार्म कंपनीच्या लशीच्या ट्रायलमध्ये पेरूमध्ये जवळपास 12,000 स्वंयसेवक सहभागी झाले आहेत. पुढील काही दिवसांतच या लशीच्या ट्रायलचा पहिला टप्पा पूर्ण होणार होता. मात्र गंभीर घटनेमुळे क्लिनिकल ट्रायलला स्थगिती देण्यात आली आहे. कायतानो हेरेडिया युनिवर्सिटीचे मुख्य शास्त्रज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वंयसेवकावर अन्य काही लक्षणाशिवाय दोन्ही पाय अशक्त झाल्याचा प्रकार घडलाय.  

चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. जग कोरोनाच्या जाळ्यात सापडत असताना चीनमध्ये कोरोना नियंत्रणात आल्याच्या बातम्याही आल्या. त्यानंतर आता पुन्हा या ठिकाणी कोरानाचे नवे रुग्ण आढळत असल्याचे दिसत आहे. चीनच्या एका शहरात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. तर एका शहरामध्ये शरव्यापी कोरोना टेस्टिंग केली जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT