Hongkong
Hongkong 
ग्लोबल

चीनने हाँगकाँगच्या स्वायत्तेचा आदर करावा - युरोपियन युनियन

वृत्तसंस्था

ब्रुसेल्स - हाँगकाँगसाठी चीन सरकारने स्वतंत्र राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा स्वीकार करण्याची तयारी चालविली असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील याचे पडसाद उमटू लागले आहेत. अमेरिकेनंतर आता युरोपियन युनियनने देखील चीनने हाँगकाँगच्या स्वायत्तेचा आदर करावा असे म्हटले आहे. 

काही मूलभूत कायदे आणि आंतरराष्ट्रीय कटिबद्धता लक्षात घेता हाँगकाँगच्या स्वायत्ततेला खूप महत्त्व असल्याचे युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिचेल यांनी सांगितले. सध्या मिचेल हे युरोपियन देशांच्या  सरकारचे नेतृत्व करतात. मिचेल यांनी आज  जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांच्याशी चर्चा केल्यानंतर माध्यमांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. 

‘चीनच्या कृत्याची आम्हाला कल्पना आहे. युरोपने नेहमीच एक देश, दोन व्यवस्था या तत्त्वाला पाठिंबा दिला आहे.  हाँगकाँगच्या स्वायत्ततेमागे देखील हाच आधार आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. चीनचे पंतप्रधान ली केक्वीयांग यांनी या नव्या सुरक्षा कायद्याचा प्रस्ताव मांडला असून  यामुळे हाँगकाँगच्या वेगळ्या कायदेशीर अस्तित्वावरच गदा  येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT