ग्लोबल

पॅरिससह नऊ शहरांत संचारबंदी लागू

वृत्तसंस्था

पॅरिस  - राजधानी पॅरिससह नऊ शहरांमध्ये शनिवारी रात्रीपासून संचारबंदी लागू झाली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. किमान चार आठवडे संचारबंदी लागू असेल.

रात्री नऊ ते पहाटे सहा या वेळेत संचारबंदी असेल. शनिवारी रात्री नऊ वाजण्यापूर्वी घरी परतण्यासाठी या शहरांमधील नागरिकांची लगबग सुरू होती. दुसरीकडे खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणारे कर्मचारीही धावपळ करीत होते. पॅरिसमध्ये रात्रीच्या भोजनाची बहुतेकांची वेळ नऊनंतरच असते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला होता. गेल्या 24 तासांत बाधित रुग्णांचा आकडा 32 हजारपेक्षा जास्त होता.

सहा ऑक्टोबरपासून बार बंद करण्यात आले होते. रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ विक्री केंद्र मात्र सुरू होती. आता बाहेर तसेच घरात असताना मास्क बंधनकारक असेल.

अत्यावशक सेवेसारखे वैध कारण नसल्यास संचारबंदीच्या काळात बाहेर दिसल्यास 158 डॉलर (11 हजार 603 रुपये) दंड ठोठावण्यात येईल.

1961 नंतर प्रथमच
फॅशन आणि नाईटलाईफसाठी जगप्रसिद्ध असलेल्या पॅरिसमध्ये 1961 नंतर प्रथमच संचारबंदी लागू झाली. त्यावेळी सुद्धा केवळ मुस्लीम नागरिकांपुरता हा निर्णय लागू होता. अल्जिरियाच्या स्वातंत्र्यावरून तेव्हा असंतोष उसळला होता. त्याआधी दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी संचारबंदी होती.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT