Guyana School Fire
Guyana School Fire Esakal
ग्लोबल

Guyana School Fire : मोबाईल जप्त केल्याचा राग, १४ वर्षांच्या मुलीनं शाळेलाच लावली आग! २० जणांचा नाहक बळी

Sudesh

सध्या लोकांना मोबाईलचं व्यसनच लागलं आहे. तीन-चार वर्षांच्या लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वच मोबाईमध्ये गुंतलेले दिसतात. मोबाईल दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याची किंवा आई-वडिलांना मारहाण केल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. अमेरिकेत मात्र एका मुलीने मोबाईलसाठी हद्दच पार केली.

शिक्षकांनी मोबाईल काढून घेतला, म्हणून एका मुलीने चक्क शाळेलाच आग लावल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण अमेरिकेत असणाऱ्या गुयाना देशात हा प्रकार घडला. महदीए सेकंडरी स्कूल असं या शाळेचं नाव आहे. गुयानामधील जॉर्जटाऊन शहरात ही शाळा आहे. या घटनेत २० जणांना आपला जीव गमवावा लागला.

"ही एक दुर्दैवी घटना आहे. विद्यार्थी आणि पालकांना आवश्यक ती सर्व मदत देण्यात येत आहे", असं देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार गेराल्ड यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं.

१४ वर्षांची विद्यार्थिनी

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी केवळ १४ वर्षांची आहे. शाळेत येताना आपल्यासोबत ही मुलगी मोबाईल घेऊन आली होती. यावेळी तिच्या टीचरने हा मोबाईल पाहिला, आणि जप्त केला. यामुळे या मुलीला भरपूर राग आला. यावेळी झालेल्या वादामध्ये तिने शाळेला आग लावण्याची धमकी देखील दिली.

हॉस्टेलच्या वॉर्डनचा राग

गर्ल्स हॉस्टेलच्या वॉर्डनसोबतही या मुलीचा वाद झाला होता अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे. एका वयस्क व्यक्तीसोबत अफेअर असल्याच्या संशयावरून वॉर्डनने तिला समज दिली होती. याचाही राग तिच्या मनात होता.

हॉस्टेलला लावली आग

यामुळे या मुलीने रात्रीच्या वेळी शाळेच्या गर्ल्स हॉस्टेलला आग लावली. हॉस्टेलचे मुख्य दरवाजे बंद करून ठेवले असल्यामुळे वेळेत बाहेर पडणं कित्येक मुलींना शक्य झालं नाही. यामुळे या आगीत कित्येक विद्यार्थिनी जखमी झाल्या. यामध्ये आग लावणाऱ्या मुलीचाही समावेश होता.

२० जणांचा मृत्यू

या आगीमध्ये एकूण २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये १२ ते १८ वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. या सर्व मुली आजूबाजूच्या लहान गावांमधून आल्या होत्या. यासोबतच, हॉस्टेल वॉर्डनच्या पाच वर्षांच्या मुलाचा देखील या आगीत बळी गेला. या आगीत जखमी झालेल्यांपैकी नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT