Emergency services battling a massive fire at Dhaka International Airport; flight operations halted as rescue teams respond to the crisis.
esakal
Major Fire Erupts at Dhaka International Airport : बांगालदेशची राजधानी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो टर्मिनलमध्ये शनिवारी दुपारी भीषण आग लागली, ज्यामुळे विमानतळावरील सर्व उड्डाणे तातडीने थांबवली गेली आहेत. ही घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. विमानतळाच्या कार्गो व्हिलेजमध्ये आग लागली असून या ठिकाणी आयातित वस्तू साठवल्या जातात.
बांगलादेश नागरी विमान वाहतूक प्राधिकरण, अग्निशमन दल आणि बांगलादेशच्या हवाई दलाच्या दोन अग्निशमन युनिट्सच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे ही भीषण आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एवढंच नाहीतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बांगलादेशचे नौदल देखील या कामात सहभागी झाले आहे. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स कडून ही माहिती समोर आली आहे.
विमानतळावरच भीषण आग लागलेली असल्याने तातडीने सर्व विमानांचे लँडिंग आणि टेकऑफ थांबवण्यात आले आहे. याचबरोबर वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आगीचे कारण आणि नुकसानीचे प्रमाण अद्याप निश्चित झालेले नाही.
तर अनेक बांगलादेशी माध्यमांच्या वृत्तानुसार, विमानतळाचे कार्यकारी संचालक मोहम्मद मसुदुल हसन मसुद यांनी दुपारी ३:४५ वाजता या घटनेची पुष्टी केली आणि आपत्कालीन उपाययोजना केल्या जात असल्याचे आश्वासन दिले.
शाहजलाल विमानतळावरील पोस्ट ऑफिस आणि हँगरच्या मध्ये कार्गो व्हिलेज आहे. विमानतळाच्या गेट क्रमांक ८ च्या शेजारी असलेल्या इम्पोर्ट कार्गो कॉम्प्लेक्स इमारतीत ही आग लागली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.