
Mozambique Boat Capsizes
ESakal
पूर्व आफ्रिकेतील मोझांबिक देशामध्ये बोट अपघात झाला आहे. मोझांबिकच्या बेरा किनाऱ्याजवळ झालेल्या बोट अपघातात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. यात एक जखमी झाला आणि पाच जणांना वाचवण्यात आले. ही घटना गुरुवारी घडली. भारतीय उच्चायुक्तालयाने शनिवारी झालेल्या दुःखद अपघाताची पुष्टी केली आणि मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला.