donald trump  
ग्लोबल

अमेरिकेत प्रवेशासाठी आता "मेरिट' हाच निकष - डोनाल्ड ट्रम्प

विलास सावरगावकर

नवी दिल्ली - "गुणवत्ताआधारित ग्रीन कार्ड धोरण हा "अमेरिका फर्स्ट' उद्दिष्ट साध्य करण्याचा एकमेव मार्ग,' असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (बुधवार) स्पष्ट केले.

"स्थलांतरितांना अमेरिकेस प्रवेश देताना गुणवत्ता हाच निकष लावणे, ही काळाची गरज आहे. या धोरणांतर्गत अमेरिकन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ शकणाऱ्या, आपल्या देशाचा आदर करणाऱ्या; अंगी कौशल्य असलेले स्थलांतरितांना यापुढे अमेरिकेत प्रवेश (ग्रीन कार्ड) देण्यात येईल,'' असे ट्रम्प यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी त्याच्या वार्षिक कामाचा आढावा आज अमेरिकन कॉंग्रेस पुढे मांडला. यावेळी स्थलांतरितांसंदर्भातील धोरणही ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. ट्रम्प यांचे स्थलांतरितांसंदर्भातील धोरण हे चार मुख्य "स्तंभां'वर आधारलेले आहे. हा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -

पहिला मुद्दा
पहिल्या घटकांतर्गत अमेरिकेत बेकायदेशीररित्या आलेल्या स्थलांतरितांच्या सुमारे 18 लाख मुलांना नागरिकत्वाचा मार्ग प्रशस्त करुन दिला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शिक्षण आणि रोजगाराच्या आवश्‍यकतेबरोबरच चांगले नैतिक चारित्र्य असलेल्यांना अमेरिकेचे नागरिकत्व प्रदान केले जाईल. या मुलांच्या भविष्याच्या खूप मोठा प्रश्न आहे. कारण अमेरिका सोडून त्यांच्या आता दुसरा कुठलाच देश नाही.

दुसरा टप्पा
अमेरिकेच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी दक्षिणेस (मेक्‍सिको) प्रचंड मोठी भिंत उभी केली जाईल. यासाठी अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहे.

तिसरा मुद्दा
आजपर्यंत चालू असलेली "व्हिसा सोडत' बंद करण्याच्या निर्णय. याऐवजी "मेरिट बेस्ड व्हिसा' देण्यात येणार आहे. आजपर्यंत अमेरिकेत जगभरातून येणाऱ्या स्थलांतरितांना दरवर्षी काही हजार व्हिसा दिले जात होते. या धोरणांतर्गत त्या व्यक्तीची कुठल्याही प्रकारची लायकी, शिक्षण वगैरे पाहिले जात नव्हते. आता तसे होणार नाही. अर्थात, भारताचा या व्हिसासाठी कधीच नंबर नव्हता. या धोरणांतर्गत मुख्यत: बांगलादेश, श्रीलंका, घाना, केनिया, व इतर काही पश्‍चिम युरोप मधील देशांमधील स्थलांतरितांना व्हिसा वाटण्यात आले.

चौथा मुद्दा
ट्रम्प यांनी सुचविलेला हा बदल फारच महत्त्वाचा आहे. या बदलांतर्गत यापुढे अमेरिकन नागरिक केवळ फक्त त्याची मुले व बायको यांच्या व्हिसा साठी अर्ज करू शकेल. यापूर्वी तो आई वडिल, भाऊ बहीण व त्यांची मुले-मुली, बायको-नवरा या सर्वांसाठीच अर्ज करू शकत होता. ही सुविधा रद्द करण्यामागे ट्रम्प यांनी विशिष्ट भूमिका मांडली आहे. या धोरणामुळे दहशतवादी अमेरिकेत येत आहेत व हे थांबावावयास हवे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांनी हे धोरण मांडले असले; तरी या धोरणास अजून अमेरिकेतील कॉंग्रेसने घटनात्मक मान्यता देणे आवश्‍यक आहे. सध्या अमेरिकेतील वरच्या सभागृहात रिपब्लिकन पक्षाचा वरचष्मा आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये या सभागृहामधील अर्ध्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात डेमोक्रॅटिक पक्षाचा विजय होण्याचीही शक्‍यता आहे. यामुळे ट्रम्प यांना या धोरणास कॉंग्रेसची मान्यता मिळविणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: एसपींकडून जॉइनिंग लेटर अन् मोठा पगार...; वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी मुलीला पोलिसात नोकरी, काय काम करणार?

Crime News: रेल्वेत प्रवाशांची लूट करणारी टोळी गजाआड, २२ लाखांचा माल जप्त

Latest Marathi News Updates : सांगलीच्या विटा शहरात विट्याचा राजा गणेशमूर्ती बनलीय गणेश भक्तांचे आकर्षण

Numerology Horoscope : 1 ते 9 मूलांकाच्या जातकांच्या आयुष्यात सप्टेंबर महिन्यात घडणार 'हे' बदल; वाचा मासिक राशिभविष्य

Asia Cup 2025: रिंकू सिंगला भारताच्या प्लेइंग-११ मध्ये संधी मिळणार नाही; वाचा असं कोण म्हणतंय

SCROLL FOR NEXT