Earthquake in Nepal
Earthquake in Nepal  sakal
ग्लोबल

Earthquake News : भल्या पहाटे नेपाळ अन् अफगाणिस्तान हादरलं; 36 तासांत दुसऱ्यांदा भूकंप

रोहित कणसे

नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.6 इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, नेपाळमधील भूकंपाचा प्रभाव भारतात जाणवला नाही.

अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला या भूकंपात सुमारे 157 लोकांचा मृत्यू झाला असून 375 लोक जखमी झाले आहेत. नेपाळमध्ये शोध आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. नेपाळमधील जाजरकोट जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या भूकंपामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यातही नेपाळमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

पश्चिम नेपाळमध्ये शुक्रवारी झालेल्या जोरदार भूकंपाने शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. शास्त्रज्ञांना अभ्यासात आढळले आहे की पश्चिम नेपाळमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली सुमारे 500 वर्षांपासून प्रचंड भूकंपीय ऊर्जा जमा होत आहे. त्यामुळे येत्या काळात रिश्टर स्केलवर आठ किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. नेपाळी भाषेतील बीबीसी वृत्तसेवेने नेपाळच्या नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरचे वरिष्ठ विभागीय भूकंपशास्त्रज्ञ लोकविजय अधिकारी यांच्या हवाल्याने सांगितले आहे की, नेपाळमध्ये दररोज 2 पेक्षा जास्त तीव्रतेचे सुमारे 10 भूकंप होतात.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मध्यम तीव्रतेचा भूकंप आवश्यक आहे कारण त्यामुळे धोके कमी होतात. दीर्घकाळ भूकंप न झाल्यामुळे पृथ्वीच्या थराखाली साचलेली ऊर्जा अचानक मोठ्या भूकंपांना आमंत्रण देते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT