Pandemic 
ग्लोबल

जागतिक पातळीवर या वर्षभरात हा शब्द सर्वाधिक वापरला गेला; कोणता ते वाचा

पीटीआय

न्यूयॉर्क - जागतिक पातळीवर या वर्षभरात सर्वाधिक वापरला गेलेला किंवा चर्चिला गेलेला शब्द कोणता असावा? ‘पँडेमिक’ (जागतिक साथ) हा शब्द ‘वर्ड ऑफ द इअर’ म्हणून ‘मेरिअम-वेबस्टर’ या शब्दकोश कंपनीने जाहीर केला आहे. कोरोना साथीने जग व्यापले असल्याने या शब्दाची निवड होणे फारसे आश्‍चर्यकारक नव्हते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वसाधारणपणे एखाद्या मोठ्या घटनेबाबतच्या वृत्तामध्ये एखादा विशिष्ट तांत्रिक शब्द वापरला जातो. तो शब्द त्या घटनेचे एक अंग बनतो. ‘पँडेमिक’ हा तांत्रिक शब्द असला तरी त्याचा सर्रास वापर झाल्याने तो सर्वसामान्य झाला असल्याचे ‘वेबस्टर’चे संपादक पीटर सोकोलोस्की यांनी म्हटले आहे. कदाचित भविष्यात सध्याच्या काळाचा उल्लेख करण्यासाठी ‘पँडेमिक’ याच शब्दाचा वापर होईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. 

कोरोना संसर्ग जागतिक पातळीवर पसरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मार्च महिन्यात जाहीर केले आणि हा शब्द जगभरातील इंग्रजी वृत्तांमध्ये, चर्चांमध्ये, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वापरला जाऊ लागला. इंटरनेटवरही या नावाचा वापर करून सर्च करण्याचे प्रमाण अचानक वाढले. हे प्रमाण १,१५,८०६ टक्क्यांनी अधिक, इतक्या अतिप्रचंड प्रमाणात वाढल्याचा दावा सोकोलोस्की यांनी केला आहे.

‘पॅंडेमिक’चे मूळ
लॅटिन आणि ग्रीक भाषेत ‘पँडेमिक’ या शब्दाचे मूळ आहे. यातील ‘पॅन’ म्हणजे सर्व आणि डेमॉस म्हणजे सर्व लोकसंख्येसाठी. या शब्दाच्या वापराला साधारणपणे सोळाव्या शतकात सुरुवात झाली. विशेषत: वैद्यकीय अहवालात साथीच्या रोगांच्या संदर्भात तो वापरला गेला.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT