ज्यो बायडेन यांच्या कुत्र्यानेही रचला इतिहास; जाणून घ्या कोणत्या विक्रमाची रंगतीये चर्चा

सकाळ ऑनलाईन
Monday, 30 November 2020

मेजरला 2018 मध्ये डेलवेयर ह्यूमेन असोसिएशनकडून दत्तक घेण्यात आले होते. 'मेजरला आमच्या कुटुंबात सामील झाल्यामुळे आम्ही खूप आनंदित आहोत, अशी प्रतिक्रिया बायडेन यांनी दिली होती. 2008 मध्ये बराक ओबामा यांच्या सरकारमध्ये बायडेन उप राष्ट्रपती असताना त्यांच्या पत्नी जिल यांनी त्यांना चँप नावाचा कुत्रा भेट दिला होता. तेव्हापासूनच बायडेन यांचे पाळीव कुत्र्यांवरील प्रेम जगजाहिर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बायडेन आपल्या पाळीव श्वानांसोबतचे फोटो शेअर करत असतात.  

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारुन नवा विक्रम प्रस्थापित करणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडने अमेरिकेचे कारभारी झाले आहेत. निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाचा धक्का दिला. सर्वाधिक मते मिळवून त्यांनी ही निवडणूक जिंकली. त्यांच्या ऐतिहासिक विजयाची चर्चा अजून सुरु असताना आता त्यांच्या कुत्याच्या नावेही एका विक्रमाची नोंद होणार आहे. बायडेन यांच्याकडे दोन पाळीव कुत्री आहेत. यातील जर्मन शेपर्ड मजर व्हाईट हाऊसमध्ये डाणारा पहिला रेसक्यू डॉग आहे. या डॉगीसोबत खेळतानाच ज्यो बायडेन यांना दुखापत झाली आहे.  

मेजरला 2018 मध्ये डेलवेयर ह्यूमेन असोसिएशनकडून दत्तक घेण्यात आले होते. 'मेजरला आमच्या कुटुंबात सामील झाल्यामुळे आम्ही खूप आनंदित आहोत, अशी प्रतिक्रिया बायडेन यांनी दिली होती. 2008 मध्ये बराक ओबामा यांच्या सरकारमध्ये बायडेन उप राष्ट्रपती असताना त्यांच्या पत्नी जिल यांनी त्यांना चँप नावाचा कुत्रा भेट दिला होता. तेव्हापासूनच बायडेन यांचे पाळीव कुत्र्यांवरील प्रेम जगजाहिर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बायडेन आपल्या पाळीव श्वानांसोबतचे फोटो शेअर करत असतात.  

वाळवंटात सापडलेला रहस्यमयी खांब गायब; एलियन्सनी पळवल्याची चर्चा

 चँप आणि मेजर या दोन श्वानांशिवाय व्हाइट हाऊसमध्ये एक मांजरही राहयला येणार आहे.  CBS संडे मॉर्निंगने ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. व्हाईट हाऊसमध्ये कुत्रा आणि मांजर एकत्र ठेवणे हा विभागणी झालेल्या देशाला एक संघ करण्याचा संदेश आहे, अशी ही चर्चा अमेरिकेत रंगली आहे.  

खुशखबर! Ola-Uber ने प्रवास करणाऱ्यांना सरकारने दिलं गिफ्ट; नियमांत बदल

यापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये बिल आणि हिलरी क्विंटन यांनी  सॉक्स (Socks) (मांजर) चांगलीच लोकप्रिय झाली होती. स्ट्रे कॅट 1993 ते 2001 पर्यंत व्हाईट हाऊसमध्ये होती. त्यानंतर  जॉर्ज बुश यांनी इंडिया नावाचे मांजर पाळले होते. ओबामांच्या काळात बो आणि सनी नावाची दोन कुत्र्यांना व्हाईट हाऊसमध्ये एन्ट्री मिळाली होती.  1849 मध्ये जेम्स पोक यांच्यानंतर डोनाल्ड ट्रंप असे राष्ट्राध्यक्ष राहिले ज्यांनी व्हाईट हाऊसमध्ये पाळीव प्रमाणाला थारा दिला नाही.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america white house president joe biden dogs major and champ to welcome a cat