satya nadela and sundar pichai
satya nadela and sundar pichai 
ग्लोबल

जॉर्ज फ्लॉइड मृत्यू, वर्णद्वेषाच्या वादात पिचाई आणि नाडेलांची उडी

सकाळ वृत्तसेवा

कॅलिफोर्निया, ता. 02 : अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर आंदोलनाचा भडका उडाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राज्यांमध्ये लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू पोलीस डेरेक शॉविनने गुडघ्याने गळ्यावर दाब दिल्यानं झाला होता. यानंतर अमेरिकेत कृष्णवर्णीय विरुद्ध श्वेतवर्णीय वाद पुन्हा उफाळून आला. आता या प्रकरणात मायक्रोसॉफ्ट आणि गूगल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा कृष्णवर्णीयांची बाजू घेतली आहे.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी म्हटले की, "आपल्या समाजात द्वेष आणि वर्णभेदाला कोणताही थारा नाही. सहानुभूती आणि सामंजस्याची भावना ही सुरवात असते आणि ती वाढावी म्हणून आपण खुप काही केलेच पाहिजे. आमच्या कंपनीत आणि आमच्या समाजात ही भावना आणखी भक्कम करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. आमच्या कंपनीच्या माध्यमातून या समाजाला आणखी मोठा आवाज उठविता यावा म्हणून आम्ही प्रयत्न करू.' 

सत्या नाड़ेला यांच्याशिवाय गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, "शोक, दुःख, संताप आणि भिती अशा ज्यांच्या भावना आहेत ते एकटे नाहीत. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. वांशिक समानतेला आणि त्याच्या शोधात असलेल्या सर्वांना आमचा पाठिंबा आहे.'

गेल्या आठवडयात 25 मे रोजी 20 डॉलरच्या बनावट नोटेचा वापर केल्या प्रकरणी जॉर्ज फ्लॉइड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तेव्हा डेरेक शॉविन नावाच्या पोलिसाने जॉर्जच्या गळ्यावर निर्दयीपणे गुडघा दाबल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

जॉर्जच्या मृत्यूनंतर हे प्रकरण वर्णभेदी असल्याचा आरोप करत कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अमेरिकेत नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी हिसांचार, जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे व्हाइट हाउससुद्धा बंद करावं लागलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT