Gurpal Singh Gill jailed after woman called 999 during rape
Gurpal Singh Gill jailed after woman called 999 during rape 
ग्लोबल

बलात्कार होत असताना तिने काढले छायाचित्र अऩ्...

वृत्तसंस्था

लंडनः युवतीने बलात्कार होत असताना त्याच्या नकळत छायाचित्र काढले व पोलिसांना दूरध्वनी करून माहिती दिली. बलात्कार होत असतानाचे छायाचित्र न्यायालयाने साक्ष म्हणून गृहीत धरून युवकाला कारागृहाची शिक्षा सुनावली.

इंग्लंडमधील लेस्टार शहरामध्ये बालात्काराची घटना घडली. याप्रकरणी गुरुपालसिंग गिल (वय 33) या भारतीय वंशाच्या युवकाला 11 वर्षांची कारागृहाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने 23 मे रोजी एका 20 वर्षीय युवतीवर बलात्कार करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात गुरुपालसिंगला दोषी ठरवण्यात आले आहे. पीडित युवतीने बलात्कार होत असताना ९९९ हा पोलिसांचा आप्तकालीन क्रमांक डायल केला. शिवाय, गुरुपालसिंगच्या नकळत छायाचित्र काढल्याने त्याच्याविरुद्धचा गुन्हा सिद्ध होण्यास मदत झाल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. गुरुपालसिंगला लेस्टार क्राऊन न्यायालयाने दोषी ठरवले असून, त्याचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याचे म्हटले आहे. त्याच्यासारख्या व्यक्तीमुळे सामान्यांच्या जीवाला धोका असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.

गुरूपालसिंगने दोन वेळा दोन वेगवेगळ्या ठिकाणी युवतीवर बलात्कार केला होता. शिवाय, याबाबत कोठेही वाच्यता न करण्याबरोबरच धमकी दिली होती, असे न्यायाधीश रॉबर्ट ब्राऊन यांनी निकाल देताना म्हटले आहे. दरम्यान, गुरुपालसिंगने गुन्हा मान्य केला असून, त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT