ग्लोबल

भिख्खूंच्या अत्याचाराच्या घटना नवीन नाहीत : दलाई लामा

पीटीआय

द हेग (नेदरलॅंड) : बौद्ध भिख्खूंकडून लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटनांबाबत मला 1990 पासूनच माहिती असून, आता असे आरोप होत असल्यास त्यात नवीन काहीच नाही, असे तिबेटचे सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी आज सांगितले. 

दलाई लामा हे नेदरलॅंडच्या दौऱ्यावर असून, येथे त्यांनी लैंगिक अत्याचारांमुळे पीडित झालेल्यांची भेट घेतली. हे अत्याचार बौद्ध भिख्खूंनी केल्याचा आरोप आहे. "अशा घटना घडतात, याची मला पूर्वीपासून कल्पना आहे. 25 वर्षांपूर्वी कोणीतरी मला या समस्येबाबत सांगितले होते. ज्या लोकांनी अत्याचार केले, त्यांना भगवान बुद्धांच्या विचारांशी काही देणेघेणे नाही,' असे दलाई लामा म्हणाले.

दलाई लामा यांनी अशा अनैतिक घटनांचा वारंवार निषेध केला असल्याचे दलाई लामांच्या प्रवक्‍त्यांनी स्पष्ट केले. नोव्हेंबर महिन्यात धर्मशाला येथे तिबेटमधील धर्मगुरूंची बैठक होणार असून या वेळी धर्मगुरूंनी त्यांना येणाऱ्या अडचणी स्पष्टपणे सांगाव्यात, अशी अपेक्षा दलाई लामांनी व्यक्त केली. धर्माचा प्रसार करणाऱ्यांनी अधिक जबाबदारीने वागले पाहिजे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT