srilanka fuel crisis
srilanka fuel crisis  Sakal
ग्लोबल

श्रीलंकेला भारताने पाठविले ४० हजार टन डिझेल

सकाळ डिजिटल टीम

श्रीलंकेत आर्थिक आणीबाणी आहे. परिस्थिती हाताबाहेर गेलीय. महागाई प्रचंड वाढलीय. देशातील इंधन संपल्याने पेट्रोल -डिझेल खरेदी करण्यासाठी लांबच्या-लांब रांगा लागल्या आहेत. श्रीलंकेला मदत म्हणून भारताने ४०,००० टन डिझेल पाठविले आहे. १ एप्रिल रोजी श्रीलंकेचे राष्ट्रपति गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी आणीबाणी जाहिर केलीय.

१२ ते १५ तास वीजकपातीने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकं रस्त्यावर उतरलेत. आरोग्यसुविधांनी देखील मान टाकलीय. अशातचं नागरिकांनी राष्ट्राध्यक्ष गोटाबाय यांच्या घरावरचं हल्ला केला. श्रीलंकन पोलिसांनी १५ जणांना या प्रकरणात अटक केलीय. तर ५४ जणांना ताब्यात घेण्यात आलंय, इंधनाची कमतरता असल्याने अनेक पेट्रोलपंपावर इंधन खरेदीसाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. ''भारताने पाठविलेली मदत श्रीलंकन नागरिकांसाठी आनंदाची बातमी असल्याचं, सिलॉन पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सुमिथ विजेसिंघे यांनी म्हंटलयं.' न्यूज वायर या माध्यमसंस्थेशी ते बोलत होते.

भारत डिझेलबरोरबच तांदूळ देखील पाठवणार आहे. भारताने श्रीलंकेला १ अब्ज डॉलरचं कर्ज देण्याविषयचा करार मार्चमध्ये झाला होता. त्याअंतर्गत खाद्यउत्पादन, धान्य, औषध आणि इतर खरेदीसाठी हे कर्ज देण्यात आलंय. १७ मार्च रोजी श्रीलंकेचे विदेशमंत्री भारत दौऱ्यावर आले असताना हा करार झाला होता. (Sri lanka economic crisis)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT