Iran's 'Zombie Angelina Jolie'  sakal
ग्लोबल

Zombie Angelina Jolie: अँजेलिनाचे भूत म्हणून ओळखली जाणारी झोम्बी कोण?

तुरुंगातून सुटल्यानंतर तिने स्वत:चा चेहरा जगासमोर आणलाय.

सकाळ डिजिटल टीम

इराणची प्रसिद्ध 'झोम्बी' जी अँजेलिना जोलीच्या नावाने ओळखली जायची तिने पहिल्यांदाच तिचा खरा चेहरा जगासमोर आणलाय. झोम्बी गेल्या 3 वर्षापासून तुरुंगात होती. तुरुंगातून सुटल्यानंतर तिने स्वत:चा चेहरा जगासमोर आणलाय.

2019 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली होती. इराणमध्ये हिजाबवर सुरू असलेल्या निदर्शनानंतर तिची सुटका करण्यात आली. (Iran's 'Zombie Angelina Jolie' shows real face photo goes viral)

हॉलिवूड सुपरस्टार अँजेलिना जोलीसारखी दिसण्यासाठी तिने चेहऱ्यावर अनेक शस्त्रक्रिया केल्या होत्या त्यानंतर तिला अँजेलिनाचे भूत म्हणून ओळखू लागले. या तरुणीचं नाव सहर तबार असून ती २१ वर्षाची आहे.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सहार तबरने पहिल्यांदाच तिचा चेहरा दाखवला. एका टीव्ही मुलाखतीसाठी ती गेली असता तिने तिचा खरा चेहरा जगाला दाखवला. तिचा चेहरा पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.

अँजेलिना जोलीसारखे दिसण्याचा नादात सहरचा चेहरा विद्रूप झाल्याने सोशल मीडियावर तिची प्रचंड चर्चा सुरु होती.मात्र आपण मनोरंजनासाठी हा टाईमपास केल्याचा दावा खुद्द सहरने केला होता.

मेक-अप आणि फोटोशॉपचा वापर करत तिने हे फोटो तयार केले होते. मात्र हे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर ईशनिंदा, गैरमार्गाने पैसे कमावणे शिवाय तरूणाईला भ्रष्टाचारासाठी प्रोत्साहित केल्याचा ठपका ठेवत तिला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता काहीच दिवसांपूर्वी तिची सुटका करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT