ग्लोबल

Operation Ajay: भारत सरकारचे मोठे यश; इस्राइलच्या युद्धभूमीतून २१२ भारतीय परतले मायदेशी!

सकाळ डिजिटल टीम

Operation Ajay: युद्धग्रस्त इस्त्राइलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या 'ऑपरेशन अजय' अंतर्गत २१२ भारतीय परत आले आहेत. आज सकाळी दिल्ली विमानतळावर पहिले विमान उतरले. असे वृत्त ANI वृत्त संस्थेने दिले आहे.

इस्त्राइल आणि हमास यांंच्यात गेल्या शनिवारपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत अडीच हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धामुळे इस्त्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून बचाव मोहीम हाती घेतली जात असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. या मोहिमेचे नाव ऑपरेशन अजय असे ठेवण्यात आले आहे.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात २१२ भारतीय आपल्या मायदेशी आले आहेत. आज सकाळी दिल्ली विमानतळावर पहिले विमान उतरले.बेन गुरियन विमानतळावरून भारतीयांना घेऊन एका खासगी विमानाने भारताच्या दिशेने रात्री नऊ वाजता उड्डाण केले. ज्या भारतीयांना मायदेशी परतायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही सेवा भारत सरकारने उपलब्ध करून दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT