Haifa Port Sakal
ग्लोबल

Adani Group : इस्त्रायलच्या हैफा बंदराचा ताबा अदाणी ग्रुपने घेतला

इस्रायल मधील हैफा बंदराचा ताबा आज अडाणी समूहाने १.२ अब्ज डॉलरला घेतला.

सकाळ वृत्तसेवा

इस्रायल मधील हैफा बंदराचा ताबा आज अडाणी समूहाने १.२ अब्ज डॉलरला घेतला.

मुंबई - इस्रायल मधील हैफा बंदराचा ताबा आज अडाणी समूहाने १.२ अब्ज डॉलरला घेतला. यावेळी झालेल्या समारंभास इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू तसेच अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी हजर होते.

नेतान्याहू यांनी या व्यवहाराचे स्वागत केले आहे. हैफा हे कंटेनरची वाहतूक करणारे इस्रायलमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर असून पर्यटकांच्या क्रूझ बोटिंच्या वाहतुकीचे ते सर्वात मोठे बंदर आहे.

या बंदराचा ताबा घेतल्यानंतर या शहराचा आणखीन विकास करण्याचे उद्दिष्ट अदाणी समूहाने स्पष्ट केले आहे. इस्रायलमध्ये अदाणी समूह आणखी गुंतवणूक करणार असून तेल अवीव्ह मध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स लॅब देखील तयार केली जाणार आहे, असेही गौतम अदाणी म्हणाले. मात्र त्यांनी यावेळी हिंडेनबर्ग अहवालावर कोणतेही भाष्य केले नाही.

या समारंभास नेतान्याहू देखील हजर होते. हायफा बंदर अदाणी ग्रुपने घेण्याचा करार अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत नेतान्याहू यांनी यावेळी व्यक्त केले. यामुळे इस्रायल व भारत या दोन देशातील संबंध आणखीन मजबूत होतील असेही ते म्हणाले.

तर यानंतर हैफा मधील बांधकाम क्षेत्रातही गुंतवणूक केली जाईल असे अदाणी समूहातर्फे सांगण्यात आले. भारत व इस्रायल या दोन देशातील दळणवळण वाढावे यासाठी आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनेकदा चर्चा केली होती. त्या चर्चेला आज मूर्त स्वरूप मिळत आहे, या करारामुळे दोन्ही देशांमधील दळणवळणाचा वेगही वाढेल. तसेच या क्षेत्रातील आगमन व निर्गमन केंद्र म्हणून हे बंदर महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. मालवाहू जहाजांना भूमध्य समुद्रमार्गे युरोपात जाण्यासाठी या बंदराचा वापर होऊ शकेल असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 20th Installment: शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता; लाभार्थी यादी कशी तपासाल?

Mumbai-Pune Expressway : चालकांची नियम मोडण्यात ‘द्रुतगती’, तब्बल २७ लाख वाहनांवर कारवाई; ४७० कोटींचा दंड, ५१ कोटी वसूल

Snake Video : गळ्यात साप, दातात साप! लाखों ‘जिवंत’ नाग घेऊन निघाली अनोखी नागपंचमी यात्रा; व्हिडीओ तुफान व्हायरल

काय सांगता? 'तारक मेहता...' मधील माधवी भाभी चेन स्मोकर आहे? म्हणते- मला काहीही फरक पडत नाही...

R. Madhavan Son's Daily Routine: "लवकर झोपा, लवकर उठा!" आर. माधवनचा मुलगा रोज उठतो पहाटे ४ वाजता! आयुर्वेदानुसार ब्रह्म मुहूर्तात उठणं आरोग्यासाठी का ठरते गेमचेंजर?

SCROLL FOR NEXT