Giorgia Meloni 
ग्लोबल

Giorgia Meloni: यूरोपात इस्लामला स्थान नाही; इटलीच्या PM मेलोनी यांचा जुना VIDEO व्हायरल

दोन दिवसापूर्वी मेलोनी यांच्या पक्षाने रोममध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा पाच वर्षे जुना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या म्हणताहेत की, इस्लाम आणि यूरोपची संस्कृती यामध्ये खूप फरक आहेत. त्यामुळे यूरोपात इस्लामिक संस्कृतीला कोणतेही स्थान नाही. (Italy Prime Minister Giorgia Meloni video Islamic culture values and rights of European civilisation have a compatibility problem)

दोन दिवसापूर्वी मेलोनी यांच्या पक्षाने रोममध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो आहे. यूरोप आणि इस्लामचे मूल्य आणि अधिकारांमध्ये खूप भिन्नता आहे. त्यामुळे यूरोपमध्ये इस्लामिक संस्कृतीला स्थान नाही, असं त्या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

इटलीमध्ये असलेल्या इस्लामिक सांस्कृतिक केंद्राना सौदी अरेबिया पैसे पुरवत आहे. सौदीमध्ये शरिया कायदा लागू आहे. शरियानुसार धर्मत्याग आणि समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवलं जातं. त्यानुसार मृत्यूदंडाची शिक्षा आहे. इस्लाक धर्म हा पूर्णपणे कुराण धर्मग्रंथावर आधारित असल्याचा उल्लेख मेलोनी यांनी केला.

मेलोनी आणि ऋषी सुनक यांनी त्यांच्या देशात होणाऱ्या स्थलांतराबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच काही देश जाणूनबुजून यूरोपमध्ये स्थलांतरित लोकांची संख्या वाढवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यूरोपातील स्थलांतरित लोकांना पुन्हा परत पाठवण्यासाठी ब्रिटन आणि इटली सरकार प्रयत्न करत असून त्यासाठी मोठी निधी गोळा करण्यात आला आहे.

आपण आता या समस्येशी तोंड दिलं नाही, तर त्यांची संख्या भविष्यात वाढत जाईल. आपल्या देशात या लोकांचा भरणा होईल. त्यामुळे आपल्या देशातील ज्या लोकांना मदत आवश्यक आहे, त्यांना यापासून वंचित राहावं लागेल. त्यामुळे मी आणि मेलोनी मिळून समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं ऋषी सुनक म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Politics:'फलटण पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार'; राजे गट अन् शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा एकदिलाने लढवण्याचा निर्धार..

माेठी बातमी! 'फलटण तालुक्यातील दाेन केमिकल कंपन्यांना भीषण आग'; सव्वाआठ कोटींचे नुकसान, पळापळी अन् काय घडलं !

Latest Marathi News Live Update : मालेगावात अफवेमुळे गोंधळ! कोर्टात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

Kagal crime News: शेतजमिनीच्या वादातून वृद्धाला आणि एका महिलेला मारहाण, या दोन परस्‍परविरोधी तक्रार कागल पोलिस ठाण्यात दाखल

Satara fraud:'कार विकून अनेकांना गंडा घालणाऱ्यांना अटक'; बनावट कागदपत्रांद्वारे सांगली, कोल्हापूर, निपाणी आदी ठिकाणी व्यवहार

SCROLL FOR NEXT