JB hits West Japan 12 people died
JB hits West Japan 12 people died 
ग्लोबल

पश्‍चिम जपानला 'जेबी'चा तडाखा ; 12 जण मृत्युमुखी

पीटीआय

टोकिओ : जेबी चक्रीवादळाने पश्‍चिम जपानला जोरदार तडाखा दिला असून, त्यात सुमारे 12 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. मागील 25 वर्षांत जपानला सामना करावा लागलेले हे सर्वांत भीषण चक्रीवादळ ठरले आहे. 

जपानच्या पश्‍चिमेकडील भागाला जेबी चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. पश्‍चिम जपानमधील क्‍योटो आणि ओसाका शहरांमध्ये "जेबी'मुळे मोठे नुकसान झाले आहे. विमान, रेल्वे आणि फेरी सेवा बंद करण्यात आली असून, ओसाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी मदतकार्य सुरू असल्याची माहिती माध्यमांनी दिली.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पूर आणि दरडी कोसळण्याची शक्‍यता असल्याचा इशारा सरकारकडून देण्यात आला असून, नागरिकांनी सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. 

"जेबी'मुळे तीनशे जण जखमी झाले असून, सुमारे 12 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचा सूचना देण्यात आल्या असल्याचे सरकारी प्रवक्‍त्याने स्पष्ट केले. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असल्याचेही समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT