Narendra Modi
Narendra Modi esakal
ग्लोबल

Narendra Modi Video : मोदींकडे स्वतः चालत आले बायडेन अन् घेतली गळाभेट; G-7 समिटमध्ये नेमकं काय झालं?

सकाळ डिजिटल टीम

G-7 Summit 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी जापानच्या हिरोशिमामध्ये जी-७च्या बैठकीसाठी पोहोचले. या बैठकीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेसुद्धा सहभागी झाले होते. या बैठकीदरम्यान जो प्रसंग घडल्या त्याने साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं.

या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघताच जो बायडेन चालत त्यांच्यापर्यंत गेले आणि मोदींची गळाभेट घेतली. पंतप्रधान मोदींनीही त्यांना मोठ्या उत्साहाने त्यांना भेट दिली. काही क्षणांच्या भेटीमुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांची गळाभेट चीनची डोकेदुखी ठरु शकते, असं बोललं जात आहे. या बैठकीत जापान आणि अमेरिकेशिवाय ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा आणि इटलीसोबत युरोपीय संघांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

परराष्ट्र सचिव विनय क्वात्रांच्या माहितीनुसार या बैठकीमध्ये संवाद वाढवणे, सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, क्षेत्रीय मुद्दे, जलवायू परिवर्तन या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-७ समिटमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्यांनी हिरोशिमा येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. मोदी म्हणाले की, हिरोशिमामधील महात्मा गांधींची मूर्ती अहिंसेच्या विचारांना पुढे नेण्यास मदत करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'डायल 108' अ‍ॅम्ब्युलन्स प्रोजेक्ट कंत्राट प्रकरण तापणार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

SCROLL FOR NEXT