US_Reddy_Biden 
ग्लोबल

'ठोको ताली'; बायडेन यांच्या भाषणामागे भारतीयाचा हात!

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष ज्यो बायडेन विराजमान झाले असून त्यांनी संपूर्ण प्रचारात अतिशय काळजीपूर्वक शब्दांचा वापर केला होता. बुधवारी (ता.२०) बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर सुमारे २० मिनिटांच्या भाषणाने अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाचे मन जिंकले. बायडेन यांनी आपल्या भाषणातून एकतेचा संदेश दिला. या संदेशामागे भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकाचा वाटा आहे.

तेलंगणशी नाते असणारे सी. विनय रेड्डी असे त्यांचे नाव असून त्यांनी संपूर्ण प्रचार अभियानात बायडेन आणि कमला हॅरिस यांची भाषणे लिहिली. एवढेच नाही तर २०१३ ते २०१७ यादरम्यान ज्यो बायडेन हे उपाध्यक्ष असतानाही विनय रेड्डी हे त्यांच्याशी जोडलेले होते. अध्यक्षाचे भाषण लिहिण्यासाठी रेड्डी यांनी नियुक्ती करण्यात आली आणि ते पहिले भारतीय अमेरिकी नागरिक ठरले. बायडेन यांचे अध्यक्षीय नात्याने होणारे भाषण गेल्यावर्षी नोव्हेंबरपासूनच लिहले जात होते. यात एकता, निष्पक्षता, आशावाद यासारख्या मुद्द्यांचा समावेश केला जात होता. 

शपथविधीनंतर बायडेन यांनी आपल्या भाषणात ‘आजचा दिवस अमेरिकेचा अन लोकशाहीचा आहे. एकीशिवाय देशात शांतता नांदू शकत नाही. आज आपण एका उमेदवाराच्या विजयाचा नाही, तर लोकशाहीच्या विजयाचा उत्सव साजरा करत आहोत. आजचा दिवस हा इतिहास आणि आशेचा आहे. जनतेच्या आशा-अपेक्षा जाणून घेतल्या आहेत. श्‍वेतवर्णियांना श्रेष्ठ मानण्याच्या मानसिकतेला आणि अंतर्गत दहशतवादाला पराभूत करू. या लढाईत प्रत्येक अमेरिकी नागरिकांनी सामील व्हावे, अशी माझी इच्छा आहे, असा उल्लेख केला. या भाषणातून त्यांनी अमेरिकेचे भविष्यातील धोरण जगाला सांगितले. मात्र प्रत्यक्षात हे शब्द होते विनय रेड्डी यांचे आणि प्रत्येक शब्द हा मोलाचा ठरला आहे.

कोण आहेत विनय रेड्डी 
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे भाषण लिहिणारे भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक विनय रेड्डी हे ओहिओच्या डायटन येथे शिकले. त्यांनी आपले शिक्षण ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉ येथून पूर्ण केले. त्यांनी बॅचलर डिग्री मियामी यूनिर्व्हर्सिटीतून मिळवली. रेड्डी यांचे कुटुंब तेलंगणातील हैदराबादपासून २०० किलोमीटर अंतरावरील पोथिरेडिपेटा गावाशी निगडित आहे. रेड्डी कुटुंबातील तीन भावंडात दुसरे असणारे विनय हे रेड्डी हे सध्या न्यूयॉर्क शहरात पत्नी आणि दोन मुलीसह राहतात.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Kolhapur News : आबाजीच गोकुळचे ‘बाप’, अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT