kili paul neema tribute to lata mangeshkar google
ग्लोबल

टांझानियाच्या भाऊ-बहिणीची लता दीदींना आदरांजली

त्यांनी बुधवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला

सकाळ डिजिटल टीम

गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या निधनाने अनेकांना चटका बसला आहे. त्यांच्या गाण्याचे देश-विदेशात चाहते आहेत. त्यामुळे जगभरातल्या अनेक लोकांनी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना आदरांजली वाहिली आहे. यात टांझानियाचे (Tanzania)भाऊ बहिणही मागे नाहीत.

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड गाण्यांवर व्हिडीओ बनवून चर्चेत आलेला टांझानियाचा किली पॉल (Kili Paul) आणि त्याची बहीण नीमा पॉल यानेही लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी बुधवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यात त्यांनी गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या 'जाने क्या बात है' या गाण्यावर लिप सिंक केले आहे. हा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला असून त्याला ७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

R.I.P to @lata_mangeshkar त्यांचा आवाज खूप शांत आणि अद्भुत होता. त्या नेहमी आमच्या आपल्या हृदयात राहील. Sleep well LATA (sic) असे त्यांनी व्हिडिओला कॅप्शन दिले आहे. किली पॉलला लहानपणापासूनच बॉलिवूड गाणी आवडतात. हिंदी गाण्यांची आवड असल्याने तो गाणी बघतो आणि यावर रील्स बनवतो. यावेळी त्याने स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले लिंप सिंक केलेले गाणे हे अमृता सिंगवर चित्रित केले आहे. त्यांनी अशा प्रकारे लता मंगेशकरांना आदरांजली वाहिल्याने नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT