अल्लू अर्जुनच्या 'श्रीवल्ली'वर थिरकला टांझानियाचा किली पॉल

बॉलिवूड गाण्यांवर व्हिडीओ बनवून चर्चेत आलेला किली पॉलचा आणखीन एक व्हिडीओ व्हायरल
Allu Arjun,Kili Paul
Allu Arjun,Kili PaulEsakal

अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा-द राइज' (Pushpa:The Rise)या चित्रपटाने तरुण वर्गाला वेड लावले आहे. जेव्हापासून या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन आले तेव्हापासून या चित्रपटातील डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सची नकल करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पुष्पा, पुष्पराज या डायलॉगवर अनेक युवक रील्स तयार करत आहेत तर‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’या गाण्यावर सोशल मीडियावर व्हिडीओ करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सध्या हा रील्स ट्रेंड सुरू असताना गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड गाण्यांवर व्हिडीओ बनवून चर्चेत आलेला टांझानियाचा (Tanzania) किली पॉल (Kili Paul) यानेही श्रीवल्ली या गाण्यावर हटके अंदाजात डान्स करत व्हिडिओ शेअर केला आहे. मुळ गाण्यातल्या अल्लु अर्जुनच्या स्टाइलला त्याने हुबेहुब कॉपी केली आहे. अल्लु अर्जुनप्रमाणेच या स्टेपमध्ये चप्पल निघालेली तो दाखवतोय. सध्या ही स्टेप खूप लोकप्रिय होऊ लागलीय. त्याच्या या रील्सला चाहत्यांनी पसंदी दर्शवली आहे. यावरअल्लू अर्जुनही खूप खुश होईल अस चाहते म्हणाले.

टांझानियात राहणारा किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल हे नेहमीच हिंदी गाण्यावर रील्स करून शेअर करत असतात. या दोघांना हिंदी समजत नाही मात्र बॉलिवूड (Bollywood) गाण्यांवर लिपसिंक (Lipsync) करत हे दोघे डान्सचे व्हिडिओ करत असतात. काही दिवसापूर्वी एका मुलाखतीत नीमाने सांगितले होते की, मला हिंदी समजत नाही, पण काही शब्द समजतात जसे दिल म्हणजे हृदय. किली पॉल म्हणतो, भारतीय चित्रपट बघत मी मोठा झालोय. माझ्याकडे फोन आहे. मी इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग रील्स पाहतो. भारतात काय ट्रेंड होतोयते मी यू ट्यूबवर वर पाहतो. मी तिथली गाणी आणि डान्स व्हिडिओ पाहतो.

किली पॉलला लहानपणापासूनच बॉलिवूड गाणी आवडतात. तो एक शेतकरी आहे. त्याच्या गावात वीज नसते. तो मोबाइल चार्ज करण्यासाठी दुसऱ्या गावात जातो. हिंदी गाण्यांची आवड असल्याने तो गाणी बघतो आणि यावर रील्स बनवतो.सध्या त्याचे रील्स अनेकांनी आपल्या अकौटवर शेअर केले आहेत. त्याचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com