ग्लोबल

युक्रेनमध्ये वापरलेले Vacuum अन् Cluster Bomb किती विध्वंसक?

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेमध्ये युक्रेनचे राजदूत ओकासाना मार्कारोवा यांनी रशियाच्या सैन्यावर गंभीर आरोप लावले आहे. त्यांनी सांगितले आहे की, रशियाने यूक्रेनमध्ये क्लस्टर बॉम्ब आणि व्हॅक्यूक बॉम्बचा वापर केला आहे. या विध्वंसक बॉम्बबाबत जाणून घेऊ या

व्हॅक्यूम बॉम्ब (Vacuum Bomb)

हा एक थर्मोबैरिक हत्यार आहेत. थर्मोबेरिक हत्यारांमध्ये दारू गोळा वापरला जात नाही. त्याऐवजी व्हॅक्यूम बॉम्बमध्ये उच्च-दाब असलेल्या स्पोटके भरलेली असतात. व्हॅक्यूम बॉम्ब प्रचंड मोठा विस्फोट करण्यासाठी आसपासच्या हवेतील ऑक्सीजन शोषून घेतात. त्यामध्ये अल्ट्रासोनिक शॉकवेव बाहेक पडतात ज्यामुळे विनाशाची पातळी वाढते. व्हॅक्यूम बॉम्ब ४४ टन टीएनटीच्या ताकदीने विस्फोट करण्यासाठी सक्षम असतो. हा ३०० मीटर परिसरास नुकासन पोहचवू शकतो. याला फादर ऑफ ऑल बॉम्ब म्हटले जाते. २०१६ मध्ये रशियाने याचा वापर सिरियावर केला होता.

रशियाने व्हॅक्यूम बॉम्ब २००७ मध्ये विकसित केला होता. त्याचे वजन ७१०० किलो असते. अमेरिकेजवळ देखील असा बॉम्ब आहे ज्याला मदर ऑफ ऑल म्हटले जाते. हे ११ टन टीएनटी ताकदीचा विस्फोट करू शकतो, त्याचे नाव GBU-43/B असे आहे.

क्लस्टर बॉम्ब (Cluster Bomb)

क्लस्टर बॉम्ब धोकादायक यासाठी मानला जातो की त्यामध्ये मुख्य बॉम्बपासून कित्येक छोटे छोटे स्फोटक(लहान बॉम्ब) बाहेर पजतात. हे छोटे स्फोटक निश्चित लक्ष्याच्या आसपास देखील नुकसान पोहचवू शकतात. यामुळे सर्व सामन्यांना नुकसान पोहण्याचा धोका वाढू शकतो. मुख्य बॉम्ब फुटल्यानंतर आसपास पडणारे छोटे स्फोटक दिर्घकाळासाठी त्याच ठिकाणी पडून राहू शकतात. त्यामुळे युद्ध संपल्यानंतर देखील या बॉम्बचे बळी ठरू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

Latest Marathi News Live Update : 'अशा बिनकामाच्या गोष्टींवर मोदी नक्कीच बोलतील..'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबाबत प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

Game Of Thrones : लॅनिस्टर गादीचा वारस हरपला.. 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

SCROLL FOR NEXT