Kulbhushan Jadhav 
ग्लोबल

कुलभूषण जाधवांना दुसऱ्यांदा 'कॉन्सुलर ऍक्‍सेस' नाही: पाकिस्तान

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या ताब्यातील भारताचे माजी नौसैनिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दुसऱ्यांदा 'कॉन्सुलर ऍक्‍सेस' देण्यास नकार दिला आहे. 

पाकिस्तानने एकदा कुलभूषण जाधव यांना क़न्सुलर ऍक्सेस दिला होता. त्यानंतर इस्लामाबादमधील भारतीय उपउच्चायुक्तांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीच्या वेळी जाधव अत्यंत दबावाखाली असल्याचे आणि त्यांना जे 'पढविण्यात' आले, तेवढेच बोलले, असा प्राथमिक अहवाल उपउच्चायुक्तांनी सादर केला आहे होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशावरून पाकिस्तानने जाधव यांच्याबरोबरच्या संपर्काची ही संधी उपलब्ध केली होती. त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्यांदा कॉन्सुलर ऍक्सेस नामंजूर केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. महंमद फैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताला दुसऱ्यांदा कुलभूषण जाधव यांच्यासाठी कॉन्सुलर ऍक्सेस देण्याची गरज नाही.

जाधव हे 2016 पासून पाकिस्तानच्या ताब्यात असून, त्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पाकिस्तानने जाधव यांना फर्मावलेल्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितल्यानंतर या न्यायालयाने हस्तक्षेप करत शिक्षा स्थगित केली असून, जाधव यांना कॉन्सुलर ऍक्‍सेस देण्याचे आदेशही दिले होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये कलम 370 रद्द करण्यावरून सध्या तणाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT