Narendra Modi in america esakal
ग्लोबल

Narendra Modi : ''30 वर्षांपूर्वी मी बाहेरुन व्हाईट हाऊस पहायचो...'' मोदींचं भाषण अन् टाळ्यांचा कडकडाट

संतोष कानडे

नवी दिल्लीः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. काल यूएनच्या मुख्य कार्यालयात मोदींच्या उपस्थितीमध्ये जागतिक योगा दिन साजरा झाला. आज व्हाईट हाऊसमध्ये मोदींचं जंगी स्वागत झालं.

व्हाईट हाऊसमध्ये मोदींच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात अनेक भारतीयांचीही उपस्थिती होती. यावेळी बोलतांना मोदी म्हणाले की, आजचा सन्मान हा अमेरिकेतील भारतीयांचा गौरव तर आहेच पण हा सन्मान १४० कोटी देशवासियांचा आहे. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश संविधानावर चालणारे आणि लोकशाही मूल्य जोपासणारी आहेत.

पुढे बोलतांना मोदी म्हणाले की, ३० वर्षांपूर्वी मी बाहेरुन व्हाईट हाऊस बघायचो. पण आज व्हाईट हाऊसने केलेला सन्मान अविस्मरणीय आहे. अमेरिकेच्या संसदेमध्ये दोन वेळा बोलण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि झिल बायडेन यांचे मी आभार मानतो, अशा शब्दात मोदींनी बायडेन कुटुंबाचे ऋण व्यक्त केले.

मोदींच्या भाषणातील मुद्दे

  • हा १४० कोटी देशवासियांचा सन्मान आहे

  • हा सन्मान अमेरिकेतील भारतीयांचा आहे

  • आज व्हाईट हाऊस भारतीयांसाठी खुलं झालं

  • ३० वर्षांपूर्वी मी व्हाईट हाऊस बाहेरुन पहायचो

  • दोन्ही देश सर्वजनहिताय सर्वजन सुखाय या मुलभूत तत्त्वांवर विश्वास ठेवतो

  • कोरोना काळात दोन्ही देशांनी एकत्रित काम केल्याने संकटावर मात करता आली

  • आम्ही भारत-अमेरिका संबंध आणि वैश्विक मुद्द्यांवर बातचित करणार आहोत

  • आजची आमची चर्चा सकारात्मक आणि उपयोगी ठरणार आहे

  • भारताचा तिरंगा आणि अमेरिकेचा झेंडा उंच झेपावत राहो

  • राष्ट्रपती बायडेन आणि झिल बायडेन यांचे आभार

  • अमेरिकेच्या संसदेमध्ये पुन्हा एकदा बोलण्याची संधी मिळाली, हे भाग्य आहे

काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी झिल बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले, अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध 21 व्या शतकातील सर्वात निर्णायक संबंधांपैकी एक आहे.

दरम्यान, व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, अमेरिका बंगळूरु आणि अहमदाबादमध्ये दोन नवीन वाणिज्य दूतावास सुरु करणार आहे. तर भारत परस्पर संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी सिएटलमध्ये दूतावास सुरु करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jack Dorsey's New App : खुशखबर! आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग; जॅक डोर्सीच 'हे' अ‍ॅप घेणार व्हॉट्सअ‍ॅपची जागा, तुम्ही पाहिलंत का?

Mumbai News: एमएसआरटीसीच्या दररोजच्या फेऱ्यात घट, कर्मचाऱ्यांना त्रास; दररोज लेटमार्कने हैराण

Latest Maharashtra News Updates : आमदार धसांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

Jalgaon News : जळगाव एमआयडीसीत आकाशातून कोसळला लोखंडी तुकडा? चौकशीत उलगडा

Suresh Dhas: सुरेश धसांच्या सुपुत्राचा कारनामा! भरधाव कारने दुचाकीला उडवले, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT