north korea declares that corona free nation
north korea declares that corona free nation 
ग्लोबल

जगात हा एकमेव देश कोरोनामुक्त; दाव्यामागे कारणंही विचित्र

सकाळ डिजिटल टीम

सोल Coronavirus : देशात उत्तर कोरियात एकही कोरोनाचा रुग्ण नसून, देश कोरोनामुक्त असल्याचा निर्वाळा उत्तर कोरियाचे अँटी इपिडेमिक विभागाचे संचालक पाक मोंग सू यांनी दिला. कोरोनाचे देशात अस्तित्व नसून आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात उत्तर कोरियाच्या या दाव्यावर कितपत विश्वास ठेवावा, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

सीमा केल्या होत्या बंद
जगभरात कोरोनाने थैमान घातले असून, अनेक देशांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. चीन, अमेरिका, ब्रिटन, इटलीमध्ये बळींची संख्या हजाराच्या वर गेली आहे. मात्र चीनलगत असूनही उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. पाक मोंग सू म्हणाले, की चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला तेव्हाच उत्तर कोरियाच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या. तेथून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणी आणि विलगीकरण केले जात आहे. तसेच निर्जंतुकीकरणही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. देशात ताप व इतर आजाराचे अनेक मृत्यू झाले आहेत; पण ते रुग्ण कोरोनाचे नाहीत. देशात सर्व आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या आहेत. सध्या तरी देश कोरोनामुक्त आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांना पत्र लिहून या कठीण काळात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

दाव्यात तथ्य?
एका बाजूला स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीविषयी शंका उपस्थित केलीय. त्याचवेळी उत्तर कोरियाने स्वतःला कोरोनामुक्त देश जाहीर केल्यानंतर त्यावर ट्रम्प यांनी भाष्य केलेले नाही. मुळात उत्तर कोरिया हा देश जगातील इतर देशांपेक्षा प्रचंड वेगळा आहे. किम जोंग उन या हुकूमशहाच्या हातात उत्तर कोरिया आहे. उत्तर कोरियाचे इतर कोणत्याही देशाशी व्यापारी संबंध नाहीत. पर्यटनाचा प्रश्नच उद्भवत नाही. उत्तर कोरियाला जाण्यासाठी चीनमधून एका रेल्वेद्वारे जावे लागते. त्यामुळं बाहेरून कोणी येईल आणि त्याचा संसर्ग उत्तर कोरियातील नागरिकांना होईल, याचीही शक्यता नाही. त्यामुळं उत्तर कोरियाच्या या दाव्यात तथ्य असल्याचा अंदाजही बांधला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT