nuclear north korea
nuclear north korea  
ग्लोबल

'अस्वस्थ कोरियन द्वीपकल्पात आण्विक युद्ध भडकणार?'

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क - "कोरियन द्वीपकल्पामधील राजकीय वातावरण अत्यंत तणावग्रस्त झाले असून या भागात कोणत्याही क्षणी आण्विक युद्धाचा भडका उडण्याची शक्‍यता आहे,' असा अत्यंत गंभीर इशारा उत्तर कोरियाच्या संयुक्त राष्ट्रसंघामधील उप राजदूताने दिला आहे.

"अमेरिकेकडून 1970 पासून उत्तर कोरियास आण्विक हल्ल्याची धमकी देण्यात येत आहे. इतक्‍या थेट व क्रूरपणे आण्विक हल्ल्याची धमकी देण्यात आलेला उत्तर कोरिया हा जगातील एकमेव देश आहे. उत्तर कोरियास स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्रसज्ज बनण्याचा अधिकार आहे. मात्र उत्तर कोरियाविरोधात दरवर्षी "अण्वस्त्रयुक्त लष्करी सराव' केले जात आहेत. शिवाय आमच्या देशातील सर्वोच्च नेतृत्वास पदच्युत करण्यासाठी अमेरिकेकडून छुप्या पद्धतीने प्रयत्नही करण्यात येत आहेत. मात्र या वर्षी उत्तर कोरियाने पूर्ण अण्वस्त्रसज्जता साध्य करण्यात यश मिळविले आहे. अमेरिकेची पूर्ण भूमी आता आमच्या माऱ्याच्या टप्प्यात आली आहे. आमच्या पवित्र भूमीवर अमेरिकेकडून एक इंचभर जरी आक्रमण झाले; तर या दु:साहसाची अमेरिकेस कठोर शिक्षा मिळेल. अमेरिकेच्या या मोहिमेत जे देश सहभागी होणार नाहीत; त्यांना आमच्यापासून कोणताही धोका नाही,'' असे किम इन ऱ्योंग हे राष्ट्रसंघातील उत्तर कोरियाचे प्रतिनिधी म्हणाले.

उत्तर कोरियावर याआधीच संयुक्त राष्ट्रसंघाकडून अधिकाधिक कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. याशिवाय अमेरिका व उत्तर कोरियामधील तणाव दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर किम इन ऱ्योंग यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली ही भूमिका अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

"ही तणावपूर्ण परिस्थिती निवळावी, यासाठी सुरु असलेले राजनैतिक प्रयत्न पहिला बॉंब टाकला जाईपर्यंत सुरु राहतील,' असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्‍स टिलेर्सन यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT