वॉशिंग्टन - आधुनिक स्पेस सूट अभियंता क्रिस्तिन डेव्हिस (डावीकडे) आणि ‘ओरायन क्रू सर्व्हायव्हल सिस्टिम’चे मुख्य अभियंता डस्टिन गेहमोर्ट (उजवीकडे) यांनी अमेरिकेच्या मानवी चांद्रमोहिमेसाठी ‘नासा’ने तयार केलेले खास स्पेस सूट पत्रकार परिषदेत सादर केले.
वॉशिंग्टन - आधुनिक स्पेस सूट अभियंता क्रिस्तिन डेव्हिस (डावीकडे) आणि ‘ओरायन क्रू सर्व्हायव्हल सिस्टिम’चे मुख्य अभियंता डस्टिन गेहमोर्ट (उजवीकडे) यांनी अमेरिकेच्या मानवी चांद्रमोहिमेसाठी ‘नासा’ने तयार केलेले खास स्पेस सूट पत्रकार परिषदेत सादर केले. 
ग्लोबल

‘ओरायन’मुळे चंद्रावरील चाल सहज

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - चंद्रावरील मानवी पावलाची यंदा पन्नाशी साजरी झाली. यानिमित्त अमेरिकेने पुन्हा चंद्रावर मानवाला पाठविण्याची घोषणा केली आहे. या वेळी मात्र चंद्रावर पाऊल टाकण्यासाठी अंतराळवीरांना खूप कष्ट पडणार नाहीत. कारण, त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या अंतराळ पोशाखाचे अनावरण ‘नासा’ने मंगळवारी (ता. १५) केले.

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) १९६९ मध्ये अपोलो यानातून चंद्रावर प्रथमच तीन अंतराळवीरांना पाठविले. मात्र, त्या वेळी त्यांनी घातलेले स्पेस सूट बोजड होते. या ‘स्पेस सूट’मध्ये पाय घट्ट बांधले गेल्याने व गुडघ्यात पाय वाकत असल्याने ते परिधान करून चंद्रावर चालणे फारसे सोपे नव्हते. आता नव्या व आधुनिक ‘स्पेस सूट’मध्ये ही कमतरता काढून टाकली असून, ते अधिक लवचिक बनविण्यात आले आहेत. नव्या पिढीच्या हे स्पेस सूट पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर आहेत. 

अमेरिकेची दुसरी मानवी चांद्रमोहीम २०२४ मध्ये प्रत्यक्षात येणार असून ‘अर्टिमिस’ असे तिचे नामकरण केलेले आहे. मोहिमेसाठी तयार केलेल्या स्पेस सूटला ‘ओरायन क्रू सर्व्हायव्हल सूट’ (ओसीएसएस) असे नाव देण्यात आले आहे. पांढरा व केशरी या दोन रंगांत हे स्पेस सूट असतील.

स्पेस सूट इंजिनिअर क्रिस्तिन डेव्हिस यांनी हा स्पेस सूट अंगावर चढवून त्याची वैशिष्ट्ये सादर करीत हात, पाय व कमरेची हालचाल कशी सहज व आरामात करता येऊ शकते, याचे प्रात्यक्षिक दाखविले. लवचिकपणामुळे एकाच मापातील हे स्पेस सूट कोणत्याही आकारमानाच्या अंतराळवीरांना वापरता येणार आहेत. मार्च महिन्यात होणारा महिला अंतराळवीरांचा पहिला ‘स्पेसवॉक’ योग्य मापातील स्पेस सूट नसल्याने रद्द करण्याची नामुष्की ‘नासा’वर ओढवली होती. मात्र, ही त्रुटी ‘ओसीएसएस’मध्ये नसेल.

‘अपोलो’ मोहिमांकडे आपण पाहिले, तर नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रीन हे अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर चालताना सशासारख्या उड्या मारत असल्याचे दिसते. पण, आता पूर्वीपेक्षा वेगळ्या स्पेस सूटमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर सहज चालता येणे शक्‍य होणार आहे.
- जिम ब्रिडेन्स्टाईन, ‘नासा’चे प्रशासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT