Nipah vaccine discovered sakal
ग्लोबल

Oxford University : ‘ऑक्सफर्ड’ने करून दाखविले; ‘निपाह’प्रतिबंधक लसीचा लावला शोध

भारतासह आशियाई देशांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या प्राणघातक ‘निपाह’ विषाणूविरोधातील पहिली लस जगप्रसिद्ध ‘ऑक्सफर्ड’ विद्यापीठाने तयार केली.

वृत्तसंस्था

लंडन - भारतासह आशियाई देशांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या प्राणघातक ‘निपाह’ विषाणूविरोधातील पहिली लस जगप्रसिद्ध ‘ऑक्सफर्ड’ विद्यापीठाने तयार केली असून या लसीच्या माणसावरील चाचण्या देखील लवकरच सुरू होणार आहेत. कोरोनापेक्षाही ‘निपाह’चा संसर्ग हा सर्वाधिक वेगाने पसरतो, यातील मृत्यूदराचे प्रमाण हे ७५ टक्के एवढे आहे.

‘सीएचएडीओएक्स१ निपाह बी’ असे या लसीचे नाव आहे. विषाणूंच्या प्राणघातक संसर्गाला रोखण्यासाठी ऑक्सफर्ड लस समूह वेगवेगळ्या लशींच्या निर्मितीवर काम करतो आहे. आता त्याला ‘निपाह’ला रोखणारी लस तयार करण्यात देखील यश आले आहे. या नव्याने तयार करण्यात आलेल्या लसीचा १८ ते ५५ वयोगटातील ५१ जणांवर प्रयोग करण्यात येईल.

संशोधकांनी १९९८ मध्ये ‘निपाह’ विषाणू शोधून काढला होता. या संशोधनाला २५ वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यावर लस तयार करण्यात संशोधकांना यश आले नव्हते. हा विषाणू वेगाने पसरतो तसेच त्याचा मृत्यूदर देखील मोठा आहे. आता नव्या लसीमुळे या विषाणूचा स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्रेक रोखता येऊ शकतो.

- ब्रायन अँगूस, प्रमुख संशोधक, नफिल्ड डिपार्टमेंट ऑफ मेडिसीन, ऑक्सफर्ड विद्यापीठ

मध्यंतरी सिंगापूर, मलेशिया, बांगलादेश आणि भारत या देशांमध्ये ‘निपाह’च्या विषाणूचा संसर्ग पसरला होता. प्रामुख्याने वटवाघळांमुळे या विषाणूचा प्रसार होत असल्याचे दिसून आले होते. डुक्कर अथवा अन्य बाधित प्राण्यांच्या संपर्कात आल्याने देखील या विषाणूचा संसर्ग होतो तसेच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला देखाल या विषाणूचा संसर्ग होत असल्याचे दिसून आले आहे. शास्त्रज्ञांना साधारणपणे २५ वर्षांपूर्वीच या विषाणूचा शोध लागला होता पण त्यावर अद्याप लस तयार होऊ शकली नव्हती.

‘सीईपीआय’ची आर्थिक मदत

या लसीच्या निर्मितीसाठी महामारीला सामोरे जाण्याची तयारी करणाऱ्या देशांच्या आघाडीने (सीईपीआय) पुढाकार घेत त्यासाठी वित्तीय साहाय्य देखील केले होते. या लसीच्या संशोधनामुळे महामारीला कशा पद्धतीने सामोरे जायचे? याचे देखील ज्ञान होईल, असे लस संशोधन आणि विकास विभागाचे कार्यकारी संचालक ईन क्यू यून यांनी नमूद केले.

वेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर

माणसावरील या लसीच्या चाचण्या पुढील अठरा महिने चालतील, यासाठी ‘सीएचएडीओक्स१’ हा वेगळा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. तत्पूर्वी अशाच प्रकारच्या प्लॅटफॉर्मचा वापर हा ऑक्सफर्डच्या ‘ॲस्ट्राझेनेका कोविड-१९’ या लसीच्या अनुषंगाने करण्यात आला होता. या लसीच्या पुढील टप्प्यातील चाचण्या या निपाहबाधित क्षेत्रात घेण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT