डॉ. सना रामचंद गुलवानी
डॉ. सना रामचंद गुलवानी sakal
ग्लोबल

पाकिस्तानच्या इतिहासात सना पहिली हिंदू महिला अधिकारी

सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू युवतीने सर्वांत कठीण प्रशासकीय सेवेबाबतची परीक्षा उत्तीर्ण केली. २७ वर्षांची डॉ. सना रामचंद गुलवानी ही सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस (सीएसएस)-२०२० ही परीक्षा उत्तीर्ण झाली असून तिच्या नियुक्तीवर नुकतेच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तिने यश मिळवले आहे.

पाकिस्तानात सीएसएस परीक्षा खूपच कठीण मानली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत नियुक्ती केली जाते. भारतातील यूपीएससीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेप्रमाणेच सीएसएस परीक्षा मानली जाते. यावर्षी केवळ २ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. सना ही मूळची शिकारपूरची रहिवासी आहे. सनाने सिंध प्रांताच्या ग्रामीण कोट्यातून परीक्षेत सहभाग घेतला. ही कोटा पाकिस्तान प्रशासकीय सेवेला ग्राह्य धरला जातो. माध्यमांशी बोलताना सना म्हणाली, की या यशाने आपण आनंदी आहोत.

पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण व्हावे, अशी आपली इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. ही परीक्षा उत्तीर्ण करण्याचे ध्येय आपण ठरवले होते. यासाठी सुरवातीपासून मेहनत घेतली असल्याचे ती म्हणाली. सनाचे पालक प्रशासकीय सेवेत पाठविण्याबाबत फारसे उत्सुक नव्हते. त्यांनी वैद्यकीय सेवेचेच स्वप्न पाहिले होते आणि ते पूर्ण झाले. परंतु तिने दोन्ही लक्ष्य पूर्ण केले आहे. पाच वर्षापूर्वी तिने बेनझीर भुट्टो मेडिकल यूनिर्व्हर्सिटीतून बॅचलर ऑफ मेडिसिनची पदवी घेतली. ती सर्जन देखील आहे. पाकिस्तानात हे दोन्ही अभ्यासक्रम एकाचवेळी करावे लागतात. युरोलॉजीत तीने उच्च शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ती फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या तयारीला लागली. पाकिस्तानच्या ७३ वर्षाच्या इतिहासात सना गुलवानीच्या रुपातून हिंदू युवती प्रथमच पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेत दाखल होत आहे.

सरकारी शाळेत शिक्षण

डॉ. सना ही शिकारपूरच्या सरकारी शाळेत शिकली. ती म्हणते, सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कमकुवत समजू नका. हे विद्यार्थीदेखील उच्चभ्रू शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणेच यश मिळवू शकतात. सना सध्या कराचीत राहते. या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण सांगू इच्छितो की, स्वत:वर विश्‍वास ठेवा आणि आपण कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो, असा विचार करा, असा सल्ला तिने विद्यार्थ्यांना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT