ग्लोबल

Article 370 : काश्मीरबाबत पाकिस्तानकडून घेतला जाणार मोठा निर्णय

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : मोदी सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने विरोधाची भाषा केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. काश्मीर प्रश्नावर या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. 

कलम 370 हटविण्यात आल्याने भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले जात आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानकडून उच्चस्तरीय बैठक सुरु करण्यात आली. याबाबत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहबूब कुरेशी यांनी सांगितले, की ''काश्मीर मुद्द्यावर भविष्यात काय रणनिती आखायची आहे, यावर पंतप्रधान खान यांनी ही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. यामधून काश्मिरी लोकांची मदत आणि समर्थन करण्यासाठी पाकिस्तानकडून पावले उचलली जाण्याची शक्यता आहे''. 

दरम्यान, इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी भारताविरोधात वक्तव्ये करत पाकिस्तानी सैन्याला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता ही बैठक आयोजित केल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT