Ten Major Points in Ukraine Russia Conflict
Ten Major Points in Ukraine Russia Conflict Google
ग्लोबल

रशियाकडून युक्रेनचे विभाजन

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को: युक्रेनच्या पूर्व भागात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या दोन प्रदेशांच्या स्वातंत्र्याला मान्यता देत रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी जगाला धक्का दिला. तसेच, या दोन प्रदेशांमध्ये सैन्य तैनात करण्याचे आदेशही देत त्यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी पूर्ण केल्याचे मानले जात आहे.

पुतीन यांनी काल (ता. २१) रात्री लुहान्स्क आणि दोनेत्स्क या बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. युक्रेनवर हल्ला करण्याचा कोणताही इरादा नसल्याचे सांगणाऱ्या रशियाने आधी बंडखोरांच्या मदतीने पूर्व भागातील लुहान्स्क आणि दोनेत्स्क या प्रदेशांमध्ये आधी संघर्ष सुरु केला आणि आता त्या भागांचे स्वातंत्र्य मान्य करत तो भाग विलीन करून घेण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. २०१४ मध्ये रशियाने क्रिमियाचाही याच पद्धतीने ताबा मिळविला होता. रशियाचे रणगाडे आणि सैन्य काल (ता. २१) रात्रीच लुहान्स्क आणि दोनेत्स्ककडे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या भागाच्या स्वातंत्र्याला आम्ही २०१४ मध्येच मान्यता दिली होती आणि आता येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठीच सैन्य पाठवित आहोत, असा दावा रशियाने केला आहे.

पुतीन यांनीही आपल्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. रशियाच्या मान्यतेनंतर बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशांमधील नागरिकांनी जोरदार आतषबाजी केल्याचा दावाही रशिया सरकारने करत छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.

आम्ही कोणत्याही परिस्थितीला आणि कोणालाही घाबरत नाही. मात्र, सध्याच्या काळात युक्रेनला स्पष्ट, प्रभावी आणि कृतिशील पाठिंब्याची आवश्‍यकता आहे. आमचे खरे मित्र कोण आणि रशियाला केवळ तोंडी धमक्या देणारे कोण, हे ठरविण्याचा हा काळ आहे.

व्होलोदीमिर झेलेस्की, अध्यक्ष, युक्रेन

सध्याच्या परिस्थितीला नाटोच जबाबदार आहे. युक्रेन हा पूर्वीपासून रशियाचाच भाग आहे. सोव्हिएत महासंघाचे पतन झाल्यानंतर पाश्‍चिमात्य देशांनी या देशाचा वापर रशियाविरोधात केला. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला निर्णय घेणे आम्हाला आवश्‍यक वाटले.

- व्लादीमिर पुतीन, अध्यक्ष, रशिया

रशियाची कृती अमान्य आहे. त्यांच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही आमच्या मित्रदेशांना सर्व सहकार्य करू.

- ज्यो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका

अमेरिकेकडून निर्बंध जारी

रशियाकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा गेल्या अनेक दिवसांपासून इशारा देणाऱ्या अमेरिकेने रशियावर जोरदार टीका केली आहे. शांततेसाठी सैन्य पाठवत असल्याचा रशियाचा दावा निखालस खोटा असून हा युक्रेनच्या सार्वभौमत्त्वावर हल्लाच आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच, रशियाने स्वातंत्र्य जाहीर केलेल्या युक्रेनमधील प्रदेशांबरोबरील व्यापार आणि गुंतवणूक तत्काळ रोखण्याचे आदेशही अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिले आहेत.

सेन्सेक्सची घसरण

मुंबई जागतिक बाजारात समभागांच्या जोरदार विक्रीमुळे मुंबई शेअर निर्देशांक मंगळवारी ३८३ अंशांनी कोसळला. साठ हजारांचा टप्पा गाठलेल्या शेअर बाजाराने ५७,३०० अंशांपर्यंत लोळण घेतली. मंगळवारी सकाळच्या सत्रात निर्देशांकात १३०० अशांची घसरण झाली. त्यानंतर लगेचच त्यातून सावरताना एक हजार अंशांची भर पडली; परंतु दिवसाच्या अखेरीस ३८२.९१ अंशांनी घसरून ५७,३००.६८ अंशांवर स्थिरावला. निफ्टीलाही विक्रीचा फटका बसला. बाजारात निफ्टीची ११४ अंशांची घसरण झाली. त्यानंतर तो १७,०९२ अंशांवर बंद झाला. टाटा स्टील, टीसीएस आणि एसबीआयला विक्रीचा मोठा फटका बसला.

जगभरातील बाजारांमध्ये पडझड

युक्रेनच्या पूर्व भागात कूच करण्याबाबत रशियाच्या अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाचा जगातील बहुतेक शेअर बाजारांवर विपरीत परिणाम झाला. आशियामधील बाजारांमध्ये आज वेगाने घसरण झाली. टोकियोमधील निक्केई २.२ टक्क्यांनी, तर, हाँगकाँगमधील हँगसेंग बाजार ३.२ टक्क्यांनी खाली आला. युरोपमधील बाजारांवरही युक्रेनमधील वादाचा परिणाम झाला. जर्मनीमधील ‘डीएएक्स’ २.१ टक्क्यांनी, तर फ्रान्समधील ‘सीएसी’ आणि ब्रिटनमधील ‘एफटीएसई’मध्येही घसरण झाली. अमेरिकेचा शेअर बाजार आज बंद होता. रशियामधील मोएक्स बाजारालाही मोठा फटका बसून तो ११ टक्क्यांनी घसरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT