ग्लोबल

शांततेसाठी हवी दहशतवादमुक्ती

पीटीआय

नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारतीय उपखंडातील शांतता कायम ठेवण्यासाठी दहशतवादमुक्त वातावरणाची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला ठणकावले. 

लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळविला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज दूरध्वनी केला होता. तसेच दोन्ही देशांमधील नागरिकांच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. बालाकोट येथील हल्ल्यानंतर प्रथमच दोन्ही देशांच्या नेत्यांनी संवाद साधला. 

"आपल्या विभागात शांतता, प्रगती आणि विकास साधायचा असेल, तर विश्‍वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. विश्‍वास निर्माण करण्यासाठी दशहतवादमुक्त वातावरण हवे,'' असे मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले. 

दोन्ही देशांच्या नागरिकांच्या हितासाठी भारत आणि पाकिस्तानने एकत्रितपणे काम करायला हवे, अशी आपली इच्छा असल्याचे खान यांनी या वेळी नमूद केले. दक्षिण आशियातील शांतता, समृद्धी आणि विकासाच्या मुद्द्यावर मोदींबरोबर काम करण्यास तयार असल्याचेही खान यांनी म्हटले आहे. त्यावर गरिबी निर्मूलनाबाबत आधीच केलेल्या सूचनेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला, अशी माहिती परराष्ट्र खात्याच्या प्रवक्‍त्याने दिली. 

मोदी आणि खान हे पुढील महिन्यात बिश्‍केक येथे होणाऱ्या शांघाई सहकार्य संस्थेच्या परिषदेसाठी जाणार आहेत. तेथे त्यांची भेट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

चर्चेस तयार : कुरेशी 

भारतातील नव्या सरकारबरोबर चर्चेची तयारी पाकिस्तानने दर्शविली आहे. "सर्व प्रलंबित मुद्द्यांवर भारतातील नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत,'' असे वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले आहे.

"रेडिओ पाकिस्तान'ने दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे, की विभागातील शांतता आणि विकासासाठी दोन्ही देशांदरम्यानच्या प्रलंबित विषयांवर एकत्रित बसून भारत आणि पाकिस्तानने तोडगा काढणे आवश्‍यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT