Oscar
Oscar 
ग्लोबल

भारताच्या 'पिरियड'ची ऑस्करवर मोहोर 

वृत्तसंस्था

लॉस एंजिलिस : "अँड ऑस्कर गोज टू... पिरियड. एंड ऑफ सेंटेन्स' ही घोषणा ऐकल्यावर टाळ्यांच्या कडकडाटात दिग्दर्शिका रायका झेहताबची यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराचे भारतीयांना कौतुक म्हणजे याची निर्माती गुनित मोंगा या भारतीय असून, दिल्लीलगतच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी यात दाखविली आहे. या भारतीय माहितीपटाने "डॉक्‍युमेंटरी शॉर्ट सब्जेक्‍ट' या गटात उत्कृष्ट लघुमाहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. 

यंदाच्या ऑस्करमध्ये भारतीय चित्रपट नव्हते. मात्र गुनित मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंट संस्थेने निर्माण केलेल्या "पिरियड. एंड ऑफ सेंटेन्स'ने आपली मोहोर या सोहळ्यात उमटवली आहे. त्यामुळे भारतीय सेलिब्रिटींनी मोंगा यांचे कौतुक केले आहे. शबाना आझमी, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, परेश रावल, विकी कौशल यांनी गुनित यांना ट्‌विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. या माहितीपटाचा विषय मासिक पाळीसंदर्भात आहे. ""मासिक पाळी समानतेवर लढा देत तुम्ही जगभरातील महिलांच्या सशक्तीकरणाचे प्रयत्न करीत आहात,'' अशा शब्दांत इराणी- अमेरिकी दिग्दर्शिका रायका झेहताबची यांनी गुनित मोंगा यांचे कौतुक केले. मासिक पाळीसारख्या विषयावरील चित्रपट ऑस्करविजेता ठरू शकेल, यावर विश्‍वासच बसत नाही, असे त्या म्हणाल्या. 

हापूरमध्ये आनंदोत्सव 
दिल्लीपासून जवळच असलेल्या हापूर या गावातील महिलांनी मासिक पाळीसंदर्भात असलेल्या जुनाट समजुतींविरोधात लढा उभारून क्रांतिकारी चळवळ सुरू केलेली आहे. या गावातील अनेक पिढ्यांपर्यंत महिलांना मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅड उपलब्ध होत नव्हते. यामुळे महिलांमधील आरोग्याचे प्रश्‍न आणि शाळेतून मुलींच्या गळतीचे प्रमाण वाढलेले होते. गावात जेव्हा सॅनिटरी पॅडसाठी व्हेंडिंग यंत्र उभारले तेव्हा असे पॅड घरी तयार करून त्यांच्या विक्रीचे कौशल्य महिलांनी आत्मसात केले. "प्लाय' या नावाखाली त्यांनी पॅड विक्रीस आणले असून, त्याद्वारे समाजाचे सशक्तीकरण करण्याचाही प्रयत्न केला आहे. या वास्तव घटनेवरच "पिरियड' हा 26 मिनिटांचा लघुमाहितीपट तयार केलेला असून, हापूरमधील स्नेहा नावाची मुलगी यात मुख्य भूमिकेत आहे. "पिरियड'ला ऑस्कर मिळाल्याचे समजताच या गावात उत्साहाचे वातावरण असून, गावकरी मिठाई वाटून यशाचा आनंद साजरा करीत आहेत. 

मासिक पाळी ही सर्वसामान्य घटना आहे. महिलेला आपले ध्येय साध्य करण्यात त्याचा अजिबात अडथळा येत नाही. याबाबत गावांमधून जनजागृती करीत गौरी चौधरी यांची "ऍक्‍शन इंडिया' ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहे. प्रजननाच्या हक्कांबाबतही ही संस्था जागृती करते. "पिरियड. एंड ऑफ सेंटेन्स' म्हणजेच "शिक्षेचा काळ संपला आहे, शिक्षणाचा नाही,' हे भारतातील किंवा जगातील प्रत्येक मुलीने लक्षात घ्यावे. 
- गुनित मोंगा, निर्माती 

ऑस्करच्या मांदियाळीतील सर्वोत्तम... 
चित्रपट 
ग्रीन बुक 

दिग्दर्शक 
अल्फान्सो क्‍युआरॉन (रोमा) 

अभिनेता 
रामी मलेक (बोहेमियन राप्सोडी) 

सहायक अभिनेता 
महेरशाला अली (ग्रीन बुक) 

सहायक अभिनेत्री 
रेगिना किंग 

ऍनिमेटेड चित्रपट 
स्पायडर मॅन ः इनटू द स्पायडर व्हर्स 

-पटकथा 
ग्रीन बुक 

-पटकथा 
ब्लॅकलान्समन 

निर्मिती डिझाईन 
ब्लॅक पॅंथर 

छायाचित्रण 
रोमा 

वेशभूषा 
ब्लॅक पॅंथर 

संकलन 
बोहेमियन राप्सोडी 

माहितीपट 
फ्री सोलो 

लघुमाहितीपट 
पिरीयड. एंड ऑफ सेंटेन्स 

परकी भाषेतील चित्रपट 
रोमा (मेक्‍सिको) 

- ऑरिजनल स्कोअर 
ब्लॅक पॅंथर 
ं 
-मूळ गीत 
शॅलो (ए स्टार इज बॉर्न) 

रंगभूषा व केशभूषा 
व्हाईस 

ऍनिमेटेड लघुपट 
बाओ 

-लाईव्ह ऍक्‍शन लघुपट 
स्किन 

ध्वनी संकलन 
बोहेमियन राप्सोडी 

ध्वनीमुद्रण 
बोहेमियन राप्सोडी 

व्हिज्युअल इफेक्‍ट 
फर्स्ट मॅन 
(केबीके ग्राफिक्‍स) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT