Political turmoil in Iraq
Political turmoil in Iraq 
ग्लोबल

इराकमध्ये राजकीय गोंधळ

सकाळ वृत्तसेवा

बगदाद - इराणचे पाठबळ असलेल्या गटाने सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरु केल्याच्या निषेधार्थ इराकमधील मुक्तदा अल सद्र या शिया धर्मगुरुच्या हजारो समर्थकांनी एका आठवड्यात संसदेत घुसत करत निदर्शने केली. संसदेची सुरक्षा दोन वेळेस भेदली गेल्याने इराकमध्ये अराजकता माजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सरकारतर्फे निदर्शकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इराकमध्ये ‘कोॲलिशन फ्रेमवर्क’ या नावाने असलेल्या आघाडीकडून देशात सरकार स्थापण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या आघाडीला इराणचे पाठबळ आहे. या आघाडीच्या प्रयत्नांविरोधात अल सद्र यांनी आवाज उठविला असून त्यामुळे त्यांच्या हजारो समर्थकांनी देशभर निदर्शने सुरु केली आहेत. या समर्थकांनी संसद परिसराभोवती कुंपण म्हणून उभ्या केलेल्या सिमेंटच्या सुरक्षा भिंती दोर लावून खाली पाडल्या. या निदर्शकांनी काल (ता. ३०) या परिसरात घुसत संसदेचा ताबा मिळविला. त्यांना पांगविण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी अश्रुधुराचा आणि ध्वनीस्फोटांचा वापर केला. यामुळे अनेक निदर्शक जखमी झाले. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल काधिमी यांनी निदर्शकांना शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. ‘आम्ही भ्रष्ट राजकीय नेत्यांना दूर करण्यासाठी आणि त्यांचा संसदेत प्रवेश रोखण्यासाठी येथे आलो आहोत,’ असे निदर्शकांनी सांगितले.

सुदानी यांचा सत्तेवर दावा

‘कोॲलिशन फ्रेमवर्क’ या आघाडीने महंमद अल सुदानी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी घोषित केल्यानंतर इराकमध्ये आंदोलन सुरु झाले आहे. आंदोलकांनी कितीही धमक्या दिल्या तरी सरकार स्थापन करू, असा दावा सुदानी यांनी केला आहे. इराकमध्ये सत्ता स्थापनेच्या चर्चेत सुरुवातीला मुक्तदा अल सद्र यांचाही समावेश होता. मात्र, जूनमध्ये ते या चर्चेतून बाहेर पडल्याने बहुमत ‘फ्रेमवर्क’च्या बाजूने गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT