quad-conference
quad-conference 
ग्लोबल

चिनी कुरघोड्यांनंतरही सुरक्षित 5G नेटवर्क देण्यासाठी 'क्वाड' कटिबद्ध

ओमकार वाबळे

जगभरात 5जी नेटवर्कचं (5G Network) जाळं विस्तारत आहे. त्याचा योग्य वापर करण्यासाठी क्वाड या चार देशांच्या समूहात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत क्वाड परिषदेसाठी रवाना झाले आहेत. यावेळी इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता आणि समृद्धी ठेवण्यासाठी क्वाड ग्रुप कटिबद्ध असल्याचे संयुक्त निवेदन चारही देशांनी दिले आहे.

चिनी कंपन्यांकडून 5G तंत्रज्ञानाच्या गैरवापर वाढत आहे. अशा वेळी वाढत्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या नेत्यांनी शुक्रवारी सुरक्षित, खुले आणि पारदर्शक 5G दूरसंचार नेटवर्क तैनात करण्याला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच नेटवर्क आणि त्यास आवश्यक सुविधांची पुरवठा साखळी तयार करण्याला सर्व देशांनी हिरवा कंदील दाखवला. येणाऱ्या काळात पारदर्शक आणि वेगवान नेटवर्क उभे करण्यासाठी चालना देण्यास उभय देशांनी सहमती दर्शवली आहे.

कोरोनानंतर पहिल्यांदा मॅन-टू-मॅन पार पडणाऱ्या क्वाड परिषदेसाठी चार देशांचे प्रमुख एकमेकांना भेटले. 5G नेटवर्कसाठी आवश्यक सेमीकंडक्टर्सच्या उत्पादनावर चीनचे वर्चस्व आहे. यामध्ये अन्य आशियाई देशांचे देखील नियंत्रण यावे, अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.

वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा हे सामील झाले होते. या नेत्यांनी आवश्यक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींच्या सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT